दिशाहीन असंघटित कामगारांची दैना.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
सागर रामभाऊ तायडे -www.ambedkaree.com
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
देशातील प्रत्येक राज्यातील गर्वसे कहो हम हिंदू है यांचा अर्थ 23 मार्च पासुन आज पर्यत दिशाहीन असंघटित मजदूरांना कामगारांना कळला असेलच अशी अपेक्षा आहे. मजदूूूरांना कामगारांना जात,धर्म,प्रांत आणि भाषा नसते तो फक्त कष्टकरी मजदूर, कामगार असतो.असे म्हणणे खुप सोपी व सुंदर असते. त्यामुळेच त्यांचे शोषण करणे सोपी असते.शोषण करण्यासाठी ब्राम्हणशाही, भांडवलशाही असलीच पाहिजे असे काही नाही.जाती जातीत प्रांता प्रांतात तसे ठेकेदार तयार करून ठेवले आहेत.तेच या मजदूरांना खेड्या पड्यातून शहरात काम करण्यासाठी आणतात. तेच निवडणुकीत मतदारसंघात यांचं मजदूरांना पैसे देऊन मतदान केंद्रावर घेऊन जातात व मतदान करण्यासाठी फक्त आर्थिक दृष्ट्या तयार करतात.मतदान करण्याचा तारखेच्या संध्याकाळ पर्यंत हे त्या पक्ष नेत्यांचे,उमेदवारांचे मायबाप उद्धार करते असतात.मतदान संपले की हे गरीब,लाचार मजदूर कामगार असतात.आज त्यांना सर्व मजदूर म्हणून ओळखतात.आता ते हिंदू नाहीत,त्यामुळे त्यांचे दुख आपले नाही.आता उमा भारतीचा कंट फुटत नाही.
कोरोना महामारीने या मजदूरांना आपली काय लायकी आहे हे त्यांना खेड्या पड्यातून शहरात आणणाऱ्या ठेकेदारांनी बिल्डरांनी दाखवून दिली. रात्रौ रात्र त्यांनी माणुसकी विकून खाल्ली आणि मजदूरांना राहत्या जागा खाली करण्यास भाग पाडले. लॉक डाऊन सुरू झाला, बाहेर गांवी जाणाऱ्या रेल्वे गाड्या,बस एसटी सर्व वाहतूक बंद आहे.बाहेर पडून जीव धोक्यात घालून घेऊ नका.असा सल्ला एकाही ठेकेदारांनी बिल्डरांनी दिला नाही.सर्वानी आपली जबाबदारी टाळली.ज्यांच्या श्रमावर यांच्या इमारती उभ्या राहतात,त्यांचातुन यांचा मोठा आर्थिक विकास होतो.तेव्हाच हे बिल्डर ठेकेदार म्हणून नांव लौकिक मिळवतात.त्यांनीच गोरगरीब कष्टकरी मजदूरांचा लॉक डाऊनमुळे बळी घेतला,म्हणून सर्च बिल्डर ठेकेदारांवर मजदूरांची हत्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.सत्यशोधक कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन मांगणी केली आहे.
देशभरातील मजदूर या राज्यांतून त्या राज्यात पायी चालत प्रवास करीत आहेत.त्यात कितीकांचा बळी गेला यांचा अंदाजच लागु शकत नाही. या गांवातुन त्या गांवात, या शहरातून त्या शहारात कामासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःहून गेले नाहीत,तर यांच्या मागे यांच्या श्रमावर जगणारे छोटे छोटे लेबर सप्लाय करणारे मुकादम,फोरमन असतात ज्यांना मजदूरांच्या मागे पन्नास शंभर रुपये मिळतात.हेच बिल्डर मोठे ठेकेदारांना मजदूर पुरतात त्यांची कुठेही रीतसर नोंद होत नाही. यांची कायदेशीर नोंद होण्यासाठी कायदे आहेत पण अंमलबजावणी करण्याची कोणीच तसदी घेत नाही.कारण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते नेते, पदाधिकारी आणि हितचिंतक हेच बिल्डर ठेकेदार,शासकीय ठेकेदार आहेत.प्रशासकीय अधिकारी वर्ग प्रत्येक बांधकामाची परवानगी देतांनाच किती कुशल मनुष्यबळ मजदूर आहेत,यांची सेफ्टी ट्रेंनिग, मेडिकल फिट प्रमाणपत्र, पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण माहिती घेतल्या शिवाय काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येत नाही.मग मुंबईत २३ मार्चला जो मजदूरांचा लोंढा बाहेर पडला त्यावर महाराष्ट्र सरकार व कामगार मंत्रालय,कामगार आयुक्तालयाचा बिल्डर ठेकेदारावर नियंत्रण नसल्याचा सबल पुरावा आहे.म्हणूनच आज पर्यत देशात कुठे ही बिल्डर ठेकेदारावर कोणती ही कारवाई झाली नाही.पोलिसांनी,वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी कोणत्या राज्यात जाणाऱ्या मजदूरांना कुठे काम करीत होता?.किती दिवसा पासून होता?.बिल्डरांचे,ठेकेदारानाचे नांव कोणीच विचारले नाही.याबाबत एकही संघटीत कामगारांची राष्ट्रीय ट्रेड युनियन असंघटीत कामगारांच्या मदती साठी पुढे आली नाही.याला ही बहुसंख्य असंघटीत कामगार मजदूर जबाबदार आहेत.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.
लाखो,करोडोच्या संख्येने असलेला हा मजदूर मतदार म्हणून कोणाला निवडून देतो.त्या पक्षाचे सरकार नेमकं कुणाचं आणि कुणासाठी असते हे ही कोरोनामुळे स्पष्ट झाले.सरकार असते ते फक्त पैसावाल्याचे, सत्तेची ताकद असलेल्या लोकांचे आणि त्यांच्यासाठीच ते काम करते.भारतातील कष्टकरी मजदूर स्वताचा जीव वाचविण्यासाठी कोणते ही वाहन नसल्यामुळे पायी चालत निघाला त्यांचे एक नाही अनेक छायाचित्र माणसाचे हृदय पिघळून टाकत आहे.तर दुसरे चित्र आहे ते इंडियातील कुठल्या तरी अशाच ताकदवान माणसाच्या घरातलं कुत्र्याचं पिल्लू ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत विमानाने सुखरूप भारतात आलं म्हणून विमानतळा वर त्याचे स्वागतासाठी बेशरम निर्दयी सरकारचा प्रतिनिधी उभा होता म्हणतात.काही महाभाग त्यांचे कौतुकाने ट्विट करतात. हे न्यू इंडियाचे खरे इंडियन्स आहेत की थर्डक्लास इडीयेट?.यांचा समाचार वृत्त वाहिन्याच्या दलाल भडव्यानी घेतला नाही.
कोरोनामुळे मजदूरांना राहत्या जागेतून बाहेर काढलेल्या ताकदवान बिल्डर ठेकेदारांच्या वाताकुलीन प्लॉट,बंगल्या पासून कोसो मैल दूर पायी चालत चाललेल्या फाटक्या कपड्यातील तुटलेल्या चपलातुन मार्गक्रम करणाऱ्या भारतीय मजदुरांचे मन हेलावून सोडणारे छायाचित्रे.ज्या बिल्डरची इमारत बांधण्यासाठी ज्या हातगाडीतून रोज विटा,सिमेंट वाहील्या जात होते. तिच्यामुळे रोजची भाजी भाकरी घरात येत होती त्याच हातगाडी मध्ये बापाने किडुकू मिडुकू कोंबून वर पोरांना बसवून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पायपीट चालविली.हे पोर मोठ्ये झाल्यावर भारताचे जागरूक नागरिक बनून भविष्य घडवील की बापाचे शोषण करणाऱ्यांना धडा शिकवेल.
आणखी एक चित्र आहे अश्या बापाचं ज्यांच्याकडे ना कुठली ताकद ना पैसा, हा बाप कुणाचं कुत्र्याचं पिल्लू अल्लाद ओंजळीत धरून उभारलेला नाही, तर बखोट धरून आपलं पोरग ट्रक च्या टपावर टाकतोय जेणेकरून उन्ह वाऱ्यात का होईना पण गांव आणि गांवातील आपला गवताचे घर बघायला मिळेल. हे बघून असा कोणताही माणूस नसेल.की ज्याच्या मनांत हळहळ झाली नसेल.आठ पी एम ला हे छायाचित्रे कधीच दिसले नाही.या बाबत दोन शब्द बोलावे असे त्या निर्दयी आठ पी एम माणसाला कधीच वाटले नाही.शहरातील उच्च इमारती ज्या हातानी बांधल्या सजविल्या त्याच इमारतीच्या प्लॉट मध्ये हे उच्चवर्णीय वर्गीय आज सुरक्षितपणे राहत आहेत, हीच माणस तुमच्या जगण्याच्या सर्व सोयी सुविधा आहेत.
हे कोट्यवधी असंघटित कामगार देशाचा आर्थिक विकास करणारे आहेत.हे संघटीत झाले तर देशात राजकीय सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात.आज ते दिशाहीन असंघटीत कामगार आहेत.म्हणूनच त्यांची दिशाहीन असंघटित कामगारांची दैना आहे.पण येणारा भविष्यकाळ त्यांच्या हाती असणार हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.