“आरे” वाचवा……………!
गोरेगाव येथील आरे येथील जंगलाची कत्तल झाली त्याविरुद्ध स्थानिक लोकनी आंदोलन सुरू केलेय आंदोलन कर्त्यांना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतलीं त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .मात्र आद बाळासाहेब आंबेडकर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान केले आहे.
सविस्तर….!
मग्रूर सेना भाजप सरकार आणि मुंबई महानगर पालिका ,एमआरडीए यांच्या संगनमताने मेट्रो च्या कारशेड साठी आरे तील जंगलाची काल रातोरात कत्तल करण्यात आली .वर शिवसेनेचे नेते झाडे तोडणाऱ्याना बघून घेऊ असे दुप्पटी धोरण घेत आहे .
मुंबईला श्वास घेऊ देणाऱ्या या वृक्षवल्ली आणि तिथे राहणाऱ्या आदिवासी पाड्या ची शेती, पशुपक्षी यांचा साधा विचार ही न करता सरकारने निर्दयपणे झाडांवर करवत चालवली गेली कोणताच नेता हा या सर्वसामान्य लोकणाच्या वतीनं आवाज न उठवता आळीमिली गुपचूप आहेत. पाखंडी आणि ढोंगी लोकांना बाजूला करीत अखेर वंचित बहुजन आघाडीचे नेते मा बाळासाहेब आंबेडकर अखेर आरे च्या जंगलात दाखल झाले …….!
त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खुद्द बाळासाहेबांनी जनतेला निवेदन केले आहे .
ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या FB वॉलवरून सभार
वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासूनच आरे वाचवण्याच्या लढ्यात पुढे आहे. ‘आरे’ जंगल, फिल्टर पाडा, मुंबई येथे आज सकाळी आरेच्या जंगल तोडीविरोधात सरकारला प्रश्न विचारायला गेलो होतो. पोलिसांनी मला ताब्यात घेतले आहे.मला अटक केलेली नाही.
पोलिसांसोबत मी पवई पोलिस स्टेशनमध्ये आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कायदा सुव्य़वस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी.