(मुंबई) आज छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती असुन त्यांनी प्रथम 1902 साली मागासवर्गीयांना नोकरीत 50% आरक्षण देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला , त्या अनुषंगाने भारतीय संविधानाने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानकर्त्यानी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी संविधानिक हक्क देऊन आरक्षणाची तरतुदी केल्या तसेच महाराष्ट्र सरकारने 1974 पासून पदोन्नतीतील आरक्षण सुरू केले.त्यानंतर 2004 साली आरक्षण कायदा करून पदोन्नतीतील आरक्षण सर्व टप्प्यावर चालु केले.कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसताना व मंत्री गट समितीचे सदस्य ऊर्जा मंत्री मा. डॉ. नितीनजी राऊत ,शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड आणि आदिवासी विकास मंत्री मा. के सी पाडवी यांना विश्वासात न घेता एकतर्फी अनुसूचित जाती(SC)जमाती(ST) भटक्या जाती विमुक्त जमाती (DTNT)व विशेष मागास प्रवर्ग (SBC)या मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील 33% आरक्षण बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीबरोबरच, बंद करण्यात आलेली फ्रिशिप योजना, शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी यांना परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट रद्द करावी, नोकरीतील साडे चार लाखांचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, मागील दिड वर्षात विविध जिल्ह्यांत अनुसूचित जाती जमातीवर मोठ्या प्रमाणात जातीयवादी लोकांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी,ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्यात यावे,सरकारी उद्योगांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण/ कंत्राटीकरण सुरू आहे ते थांबविण्यात यावे , कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावे,कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने रु 50/- लाख देण्यात यावे आदी विविध 16 मागण्यासाठी राज्यातील सर्व SC,ST,DT,NT,SBC,OBC च्या कामगार, कर्मचारी,अधिकारी विद्यार्थी संघटना, समाज संघटना यांच्यावतीने राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर व मुंबई,ठाणे,नवी मुंबई, पालघर जिल्ह्याचा मंत्रालयावर आक्रोश मोर्चा होणार आहे. या मोर्चास कॉग्रेस पक्षाचे मा.नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे व ते नाशिक येथील मोर्चा मध्ये व मा.चंद्रकांत हांडोरे मुंबई येथील मोर्चा मध्ये सहभागी होणार आहेततसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. भीमरावजी आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा.आनंदराजजी आंबेडकर , रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अध्यक्ष राजेंद्र गवई, तसेच BRSP चे प्रमुख ऍड. सुरेश माने, गोंडवान गणंतत्र पार्टी , धनगर समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, उचालाकार लक्ष्मण माने, पारधी समाजाचे नेते अप्पासाहेब साळुंखे, तसेच ऍड. एच. पी. पवार, मा. रामू काळे अश्या इतर शेकडो सामाजिक संघटनांनी आपला पाठींबा दिला आहे.सरकारने आमच्या मागणीची दखल घेतली नाही व आरक्षण हक्क कृती समिती, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा.अँड. बाळासाहेब आंबेडकर , मा. भिमराव य आंबेडकर, मा. नाना पटोले व काही आमदार यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागूनही चर्चाही केलेली नसल्याने हा मोर्चा नाईलाजास्तव काढण्याची पाळी आमच्यावर आणली आहे. मोर्चा कोरोनाचे सर्व नियम पाळून काढण्यात येणार असल्याची माहिती आरक्षण हक्क कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आरक्षण हक्क कृती समितीप्रसिध्दीपत्रक.pdf