अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक

अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक

बुवा बाबा अम्मा बापु यांच्या नादाला लागलेल्या कित्येक भारतीयांना अंधश्रध्देतुन बाहेर काढण्याची गरज आहे.

भारतात धर्मसत्तेपाठोपाठ या भोंदु बाबांची ही सत्ता आता मोठ्या प्रमाणात कार्य करत असुन अज्ञानी अन पैशासाठी हपापलेल्या लोकांची शिकार ते अलगद पणे करत आहेत. भारतीय समाजव्यवस्थेला हा मोठा अडसर असुन लवकरात लवकर अंधश्रध्देविरोधातील कायदा देशभर लागु व्हावा अशी मागणी करणे गरजेचे आहे. यातुन होणारे स्रियांचे ,बालकांचे शोषणही थांबेल. अनेक भोंदु बाबा स्रियांचे शोषण करत असुन धर्माच्या नावाखाली हे सार सहन केले जात आहे.

अंधश्रध्देच्या प्रश्न पुन्हा एकदा समोर येण्याचे मुख्य कारण म्हणजे मथुरेत घडलेली घटना. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मांत्रिकाच्या सांगण्यावरून चार जणांनी एका १९ वर्षांच्या मुलाचा बळी दिला . पोलिसांनी असा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाला आणि तरूणाचा बळी देणाऱ्या चौघांना अटक केलीय.

 

सचिन नावाचा एक रिक्षा चालक अचानक बेपत्ता झाला, ज्याची शोधाशोध सुरू झाली. पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी विनोद साइनी आणि राजेंद्र यादव या दोघांना अटक केली. कारण ते सीसीटीव्हीत दिसले होते. सचिन बेपत्ता होण्याआधी हे दोघे त्याच्यासोबत दिले होते. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी सुरु केली. ज्यानंतर विनोद आणि राजेंद्र यांनी आपल्यासोबत आणखी दोघे होते असे सांगितले. या चौघांनी सचिनचे अपहरण केले आणि तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याला ठार केले असी माहिती समोर आली आहे.

तांत्रिकाने सांगितलेले होते की तरूणाचा बळी दिला तर तुम्ही लखपती व्हाल म्हणून आम्ही हा बळी दिला अशी कबुली या चौघांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिेले.

या चौघांविरोधात कलम ३०२ आणि कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अजूनही चौकशी सुरू असल्याचे सरदार पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. विनोद आणि राजेंद्र यांनी रिक्षा बोलावली. ही रिक्षा सचिन चालवत होता. ते दोघेही सचिनला महादेव घाट या ठिकाणी येऊन गेले.

तिथे त्याचा बळी देण्यात आला एका केबलने गळा आवळून सचिनची हत्या करण्यात आली.

मांत्रिकाच्या सल्यावरुन अंधश्रध्देवर विश्वास असणार्‍या या आरोपींनी लक्षाधीश होण्याच्या खोट्या मोहाला चारजण बळी पडले आणि लक्षाधिस झालेच नाही मात्र एका निष्पापाचा बळी घेवुन आता तुरुंगाची हवा खात आहेत.

-प्रमोद रामचंद्र जाधव

Next Post

दडपलेल्या  संस्कृृतीकडे समाजाचेच दुर्लक्ष.....!

मंगळ एप्रिल 17 , 2018
मोठमोठ्या शब्दांचे इमले नाही तर कृतीतून नंदनवन तयार होते. महामानव डाॅॅ बासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या सुपीक जमिनीवर खुशाल मजा करा पण त्यांनी जे झाड खडकावर लावले आहे त्याचे संगोपन आधी करा.  त्यांनी  जेव्हा बौद्ध लेणी वर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते […]

YOU MAY LIKE ..