ती आणि तिने जिंकले-शिकवले

 

ती आली ,तिने सांगितले आणि तिने जिंकले-

आज अमरावती येथे बाळासाहेब आंबेडकर यांची संवाद याञा कार्यक्रम पार पडला
पन या कार्यक्रमा मध्ये जि घटना घडली ति एकदम मनाला भिडुन गेली
कार्यक्रमाचे सुञ संचालन सुरु असतांना.
खुप धापा टाकत स्वत:ला सावरत कस बस का होईना ती स्टेज वर चढत आली.
सर्व लोकांच्या नजरा तिच्या वर आयोजकांना सुध्दा विचार पडला ही म्हातारी कशाला स्टेज वर आली असेल
परंतु तिच्या मध्ये असलेली क्रांतीची ज्वाला
कस बस सावरत स्टेज वर येताच तिने आपले अश्रु पुसुन अमरावतीचे शहराध्यक्ष (भा.री.प.) बाबाराव गायकवाड यांना आपल्या पिशवितली शंभर रुपयांची नेाट काढुन दिले आणि म्हणाली बाबासाहबांचे कार्य असेच चालु द्या पोरांनो
आणि पुन्हा तिच्या डोळ्यातुन अश्रु निघांले.
हा प्रसंग मि माझ्या डोळ्यानी बघितला.
आणि सहजच तिला विचारले माई एवढी तळमळ कशी तुला
तर तिने जे मला सांगितले ते ऐकुन मी दोन मीनिटांसाठी स्तब्धच झालो.
कारन तिने जे सांगितले ते खरच तिने तिच्य् जिवना मध्ये सोसले असावे.
तिने मला सांगितले बाबु तुम्ही आत्ता सुख चैनने राहत आहाना
ते सर्व बाबासाहेबा मुळे आहे रे पोरा
तो काळच काही वेगळा होता आमच्या साठी

आम्ही जी हाल अपेष्टा सहन केली ति फक्त आम्हालाच माहीत
आज मले जे सुखाचे दिवस पाहाले मिळत आहे
ते उपकार माया बाबासाहेबाचे आहे
आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला पाहाले मिळत आहे ते माझ लय मोठ भाग्य आहे
आत्ता मी मरुन जरी गेले तर सुखाने मरन पत्करनार
अशि तळमळ असनारी ही म्हातारी आजी आली होती वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्या मध्ये असनार एक छोटेसे खेळे गाव विळेगाव येथुन जिचे नांव आहे मंजुळा बाई निघोट
आणि खरच मनाला खुप बर वाटल या आजी बाईला पाहुन
आणि या मधुन मी एकच बोध घेतला तो म्हणजे बाबासाहेबांची चळवऴ ही अशिच धगधगती ठेवुया
आणि आदरनीय बाळासाहेब आंबेडकरांनाच शेवट पर्यंत साथ देवुया
मिञांना आवडल्यास नक्की आपल्या माणसां बरोबर शेअर करा.
सुमित कांबळे
अमरावती

Next Post

आंबेडकरी दिवंगत नेते आद दादासाहेब रूपवते यांचे जेष्ठ चिरंजीव प्रेमानंद रूपवते काळाच्या पडद्याआड...!

शनी ऑगस्ट 4 , 2018
प्रेमानंद रूपावते …..काळाच्या पडद्याआड आंबेडकरी चळवळीतील प्रख्यात नेते दिवंगत मान दादासाहेब रूपावते यांचे जेष्ट चिरंजीव व चळवळीतील एक प्रख्यात नेतृत्व प्रेमानंद रूपावते उर्फ बाबूंजी यांचे आज निधन झाले . आपल्या वाडीलांप्रमाणे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत झोकून घेऊन आपले उभे आयुष्य फुले शाहू […]

YOU MAY LIKE ..