डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्णपणे आंबेडकरी विचार स्विकारत नाही.स्वीकारले तर काय होईल?.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या क्रांतिकारी घोषणा,प्रतिज्ञा म्हणजेच त्यांनी दिलेला कोणताही मंत्र आज समाजात पूर्णपणे रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.आंबेडकरी चळवळ आणि समाजात मैत्री भावना वाढली तरच इतर सर्व बहुजन समाजात मैत्री भावना निर्माण करता येईल.मैत्री भावनेमुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे ही राहलो असे म्हणता येत नाही.समृद्ध प्रबुद्ध भारत निर्माण करायचा असेल तर आंबेडकरवादा शिवाय पर्याय नाही.अन्याय अत्याचार झाला तर लढण्याची शक्ती आंबेडकरी विचारधाराचं प्रेरणा देते.समता स्वतंत्र,मुलभूत अधिकार,मान सन्मान,न्यायहक्क प्रतिष्ठा याचे बीज म्हणजेच आंबेडकरवाद आहे,ते जगाच्या कोणत्याही भूमीतील मानवाच्या शरीरात आपली जागा बनवून ते उगवू शकते. हे १३० भिमजयंतीनिमित्त समजून घेणे आवश्यक आहे.भिम जयंतीत फक्त नाच गाणे डी जे नाही.तर एक स्पिरीट आहे.फक्त भिमजयंती च्यावेळीच येते असे नाही,अन्याय अत्याचारांच्या विरोधात जनआंदोलनात तो नेहमीच दिसत असतो.फक्त निवडणुकीत दिसत नाही.
आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व चळवळ दिशाहीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही. त्यासाठी आंबेडकरी चळवळ आणि समाजात मैत्री भावना वाढली पाहिजे होती ती मोठा प्रमाणात कमी झाली आहे.त्यामुळेच गटबाजी आणि अनेक संस्था संघटनांचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण झाले.हे कुठे तरी थांबले पाहिजे.मैत्री भावना वाढली पाहिजे.
बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती, नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होतात. तो ही एक स्पिरिट आहेच. मातृसंस्थांचे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे त्यांच्याकडे पाहतात.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभावच्या राजकीय मंत्राचा मनापासून आदर करण्याचा आव आणतात.त्यामुळे आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व चळवळ दिशाहीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही. त्यासाठी आंबेडकरी चळवळ आणि समाजात मैत्री भावना वाढली पाहिजे होती ती मोठा प्रमाणात कमी झाली आहे.त्यामुळेच गटबाजी आणि अनेक संस्था संघटनांचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण झाले.हे कुठे तरी थांबले पाहिजे.मैत्री भावना वाढली पाहिजे. भिमजयंती मध्ये सर्व कोणत्या भावनेने एकत्र येतात?.
लॉक डाऊनच्या या काळात घराघरात भिम जयंती पुस्तक वाचून साजरी केली तर येणाऱ्या काळात मनुवादी ब्राम्हणशाही भांडवलशाही विरोधात लढण्याची संघशक्ती निर्माण करणारी प्रेरणा शंभर टक्के मिळू शकते आणि आरोग्याची काळजी घेऊन संविधानाने दिलेल्या कायदा सुव्यवस्थेचा आदर केल्याची इतिहासात नोंद होऊ शकते. एका बाजूला आम्ही भाजपच्या नरेंद्र,देवेंद्र यांना त्यांच्या विचारधारेला सतत विरोध करीत राहणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच हस्ते भिमजयंतीचे,भिम महोत्सव किंवा भिम शाहिरी जलसा, राष्ट्रर्निर्माते विचार महोत्सव साजरा करणार,यातुन आम्ही काय बोध घ्यावा?. त्यांना शत्रू म्हणून लांब ठेवणार कि मित्र म्हणून जवळ करणार?.त्यांच्या आर्थिक मदतीवर किंवा सामाजिक सलोख्यावर आम्ही राजकीय लढाई कशी लढणार?. मोठे नेते कार्यकर्ते,पत्रकार,विचारवंत साहित्यिक योग्य मदत सहकार्य घेऊन सुरक्षित नोकरी करून, प्लॉट,टॉवर,बांगला असा सुरक्षित ठिकाणी राहतील,पण खेडया पडयातील व शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या समाजाचे काय?. यांनी बाबासाहेबांचे प्रामाणिक शिष्य किंवा भक्त म्हणून शासन कर्ती जमात बन्या करीता मतदार म्हणून कोणाला मतदान करावे?. हा प्रश्न कायम निकालात निघाला पाहिजे.
आपल्या समाजातील शत्रू पक्षात असलेल्या मित्राला कि मित्र पक्षातील शत्रूला?. मैत्री भावनेने जवळ केले पाहिजे अन्यता मैत्री भावनेत कायमची दरी निर्माण होणार आणि होत राहणार.राजकारणी लोक स्वताच्या फायद्यासाठी दोन समाजात नेहमीच तेढ निर्माण करतात.पण संकट आले तर शेजारीच शेजाऱ्याला मदत करण्यासाठी उभा राहतो.तेव्हा तो जात धर्म,प्रांत पाहत नाही.त्यालाच मैत्री भावना मानतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती मोठया उत्सवात साजरी करणाऱ्या प्रतिष्ठान,फाऊंडेशन, मंडळ,संस्था,संघटना यांचे मुख्य उद्दिष्ट कोणते?.यांचे राजकीय उद्धिष्ट कोणते?.यांचा विचार कोण आणि कधी करणार?.कोरोना महामारीने लॉक डाऊनमुळे त्यांचे गेल्या दोन वर्षात मोठे नुकसान झाले.शत्रू चार वर्षात अनेक राज्यातील केंद्रातील राजकीय सत्ता हातात घेऊन संविधानाने दिलेले सर्व मूलभूत अधिकार नष्ट करीत असतांना आम्ही फक्त एका दिवसाचे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कोरोनाच्या महामारीत लॉक डाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसून भिमजयंती साजरी करण्याचा मनोदय व्यक्त करीत आहोत.त्यासाठी ही गटागटाने तसिलदार,जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांना निवेदन देत आहोत.हे करण्यासाठीच पुन्हा पुन्हा गटबाजीत गुंग आहोत.
आजच्या परिस्थितीत आंबेडकरी विचारांच्या सर्व भारतीयांना एकत्र करून मैत्री भावना वाढविली पाहिजे.हीच आंबेडकरी विचारांच्या पक्षाला सुवर्ण संधी आहे.त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेल्या सर्व मागासवर्गीय समाजाला विश्वास देऊन राजकिय सत्ता परिवर्तनास सज्ज केले पाहिजे.आंबेडकरी चळवळ आणि समाजात मैत्री भावना वाढविली पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं असंघटीत अशिक्षित दलित शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.
आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित दलित शोषित समाजाची काय अवस्था असेल?.या चिंतेने ते सतत तळमळत होते.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल तेवत ठेवण्यासाठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला.इंग्लंड,कोलंबिया सारख्या साता समुद्राच्या पलीकडे परदेशात उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद,संघटना व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही. कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.
आजचे नेते एका आमदार,खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात. त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे मागासवर्गीय शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद्धा) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.पण बदल होत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मनुस्मृती जाळली, महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली.
दलित शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविला.आणि आज खरेच मागासवर्गीय शोषित समाजात जास्तीचाच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाली.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.त्यांच्यात मैत्री भावना निर्माण करणे हेच आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्ता व नेत्या समोर आव्हान आहे.
माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती.ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.
धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये. तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे. याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता “सर्वधर्मसमभाव” ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.त्यांच्यात प्रथम मैत्री भावना निर्माण करावी लागेल.त्यासाठी विशेष संघशक्ती दाखवावी लागेल.काही वेळा “लाथो के भूत बातो से नही मानते” असे म्हणतात.
बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो. शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला,काल्पनिकतेला, कर्मकांड व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाजात कमी दिसते.सामाजिक,सांस्कृतिक परिवर्तन झाल्या शिवाय राजकीय परिवर्तन होत नसते. हे समजून न घेता आम्ही राजकीय परिवर्तनाचे स्वप्न पाहतो. त्यामुळेच बहुसंख्य मागासवर्गीय,आदिवासी अल्पसंख्याक सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभावचा मागे जाताना दिसतात. तिथेच तो शंभर टक्के फसल्या जातात.आज देशात जी परिस्थिती आहे. ते भविष्यकाळ खतम करणारी आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि समाजातील भारतीयांना मैत्री भावना वाढवावी लागेल.याचा १३० व्या भिमजयंती दिनी गांभीर्याने विचार झाला पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याग,कष्ट आणि जिद्दीने सर्व समस्यांवर विजय मिळविला.म्हणूनच त्यांचा १३० वर्षा नंतर ही जयजयकार होत आहे.आपण त्यांचे अनुयायी कुठे त्याग,कष्ट,जिद्दीने काम करतो त्यांचे आत्मपरीक्षण झालेच पाहिजे.तर मैत्री भावना निर्माण होईल.भिमजयंती निमित्याने त्या महामानवाला त्यांच्या त्या त्याग,कष्ट व जीद्धीला कोटी कोटी प्रणाम.भिमजयंती निमित्याने सर्व वाचकांना हार्दिक मंगल कामना!. जयभीम!. जयभारत !!.
आयु सागर रामभाऊ तायडे.मोब -९९२०४०३८५९
ए /५,इनायत नगर ,गावदेवी रोड,भांडूप (प ) मुंबई -४०००७८