असंघटित कामगारांच्या न्याय हक्क प्रतिष्ठेसाठी लढणारा त्यांना सन्मानाने कसे जगावे आणि स्वाभिमान म्हणजे काय यांचे प्रशिक्षण देऊन प्रबोधन करणारा कोणी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी कधी आपण झोपडपट्टीत कार्यरथ पाहिला?. राजकीय नेते मत मांगण्यासाठी झोपडपट्टीतील असंघटित कामगारांच्या पाया पडतांना आपण पाहीले असतील पण असंघटित घरकामगार महिला, नाका कामगारांच्या माणसातील माणूस जागा करण्यासाठी प्रबोधन करणारा आणि त्यांना स्वयंरोजगार देणारा वकील कधी पाहिला?. डॉ बाबासाहेब आंबेडकर विधितज्ञ वकील होते, बॅरिस्टर झाले. ते न्यायधीस होऊ शकले असते. पण त्यांनी समाज व चळवळीसाठी त्यापदाचा स्वीकार केला नाही.म्हणून आज समाज आणि चळवळ उभी आहे. त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करणारे कोणी आहेत.
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो ते पेईल तो गुरंगरल्या शिवाय राहणार नाही.-महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
खरंच शिक्षण वाघिणीचे दुध सर्वांसाठी असते काय ?.भारतच्या न्यायालयीन व्यवस्थेत वकिलांना व न्यायाधीशांना खुप महत्व असते. एखादा माणूस वकील असतो.त्यानंतर तो जर न्यायधीश होतो.आता एल एल एम ची परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश होता येते. त्याला सरकार दरबारी खुप मान सन्मान असतो.खुप सोयी,सवलती असल्यामुळे आर्थिक परिस्थिती भक्कम असते. पण त्यांचे समाजात चळवळीत योगदान शून्य असते. तो समाजासाठी चळवळीसाठी काहीच करू शकत नाही. नातलगांच्या किंवा सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात नियमानुसार तो कुठेही सहभागी होऊ शकत नाही. त्याच्यात समाजाप्रती,चळवळीप्रती जिव्हाळा, आपुलकी असेल तर त्याला कोणताही कायदा कानून रोखु शकत नाही. त्यांची इच्छा शक्ती असेल तर तो सहभागी होऊ शकतो. नसेल तर कुठेच जाऊ शकत नाही. असा व्यक्ती कितीही उच्चशिक्षित उच्चपदस्थ आणि आर्थिक दृष्ट्या करोडपती असला तरी त्यांची समाजात किंमत शून्य असते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एल एल एम ची परीक्षा देऊन न्यायधीश होण्यापेक्षा समाजकार्यात आंबेडकरी चळवळीत अग्रस्थानी राहणे पसंत केले. असे आज सहकार चळवळीत ऍड प्रमोद सागर तायडे हजारो तरुणांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देत आहेत. माझे जेष्ठ बंधू प्रमोद दादा यांच्या प्रेरणादायी यशस्वी वाटचालीसाठी हा पत्रप्रपंच..
सिद्धार्थ नगर भांडुपला राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा येथे अकरावी, बारावीला शिक्षण घेत असतांना प्रमोद दादा झोपडपट्टीतील नाका कामगार, घरकामगार, कचरा वेचणाऱ्या, लसून विकणाऱ्या महिला यांच्या घराघरात जाऊन सत्यशोधक नागरी सहकारी पतपेढीची दैनिक बचत ठेव गोळा करीत होता. बचत कशी करावी, बचत गट कसा बांधावा यांचे प्रशिक्षण देणारा हा मुलगा आज देशातील सर्वात मोठी जिल्हा बँक मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कायदेविषयक सल्लागार मंडळावर आहे. भारत सरकार कायदे मंत्रालयाची न्यायधीसापदाची सुरक्षित नोकरी नाकारणारा हा तरुण समाजसेवा करण्यापेक्षा समाजपरिवर्तनासाठी अहोरात्र झटतो आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना राज्य व केंद्र सरकारच्या आहेत. पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. मागासवर्गीय तरुणांना राजकारणात जास्ती पसंती असते. कारण तिथे सर्व फुकट खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी लागणारा पैसा कुठून येतो यांच्याशी त्यांना काही घेणे देणे नसते. त्यामुळेच आज बहुसंख्य तरुण व्यसनाधीन, लाचार आणि गुलाम झाले आहेत.स्वताचे पोट भरेल एवढे उत्पन्न नसतांना तरुण पिढीला दारू पिण्यासाठी व महागडे मोबाईल वापरण्यासाठी पैसा कुठून येतो. असा रोखठोकपणे प्रश्न विचारणारा प्रमोद तायडे कुठे ही भेटणार नाही. या समस्यावर संशोधन करून कायम स्वरूपी उपाय योजना राबविली पाहिजे व्यसनाधीन तरुणांना मार्गदर्शन करणारे आणि विचारधारा मानणारे संघटन असले पाहिजे.
ते सत्यशोधक विद्यार्थी संघटना होते.आणि आहे.प्रमोद दादा यांचा सत्यशोधक विद्यार्थी संघटना ते अकॅमे नागरी सेवा संस्था हा प्रवास सध्या सोपा नाही.त्यांचे बी ए,एल एल बी,डी एल एल,आणि एल डब्ल्यू (B.A,L.L.B,D.L.L & L.W) शिक्षण झाले आहे.माझ्या प्रमोद दादाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचे बाळकडू घरात वडिलांकडून विद्यार्थी दशेतच मिळत होते. प्रगती विद्यालयात एस एस सी पर्यत शिक्षण घेत असतांना भट्टीपाडा भाजी मार्केट ते भांडुप स्टेशन कधी न फिरणारा दादा एस एस सी नंतर डॉ आंबेडकर आर्ट आणि कॉमर्स कॉलेज वडाळा येथे दाखल झाला.त्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या प्रवाहात सहभागी झाला.त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार चळवळ त्यांला जवळून पाहण्यास मिळाली. म्हणूनच तो विचारतो आंबेडकर चळवळीचे मुख्य उद्धिष्ट काय आहे?.
समाजसेवक खूप आहेत.पण समाजपरिवर्तन करणारे शिक्षण वाघिणीचे दुध कुठे असते. असंघटित कष्टकरी मजुर,घरकामगार,नाका कामगार यांना न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रमोद दादा त्यांच्या विभागात जाऊन माहिती देण्याचे काम तेवढ्याच आपुलकीने आजही करीत आहे. तो कधीच स्वतःची ओळख सुप्रीम कोर्टात काम करणारा वकील म्हणून करून देत नाही. समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या संस्था, संघटनांना योग्य शासकीय मदत मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे हे या वकिलांचे कर्तव्य असते. कार्यकर्त्यांना संस्था संघटनानां सतत प्रोत्साहन देऊन त्यांना किर्याशील बनविणारे वकील,अधिकारी म्हणजेच प्रमोद दादा सारखे तरुण असावेत. ते समाजाला वेळ देतात त्यांचा जनसंपर्क मोठा असतो. मुंबई जिल्हा बँकेचे काम, सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेचे टेंडर भरून काम मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव काम मिळविल्या नंतर कामगार,अधिकारी आणि स्थानिक राजकिय कार्यकर्ताची मनधरणी करून अडचणी दूर करण्यासाठी विशेष कौशल्य आत्मसात करावे लागते हे सर्व प्रमोद दादाने करून दाखविले.
उच्चशिक्षित वकील,डॉक्टर, प्राध्यापक इंजिनियर अधिकारी वर्ग सामाजिक कार्याला महत्व देतात म्हणूनच त्यांच्या कामाची दखल घेऊन काही तरी लिहावे हे माझ्या मनात नेहमीच असते. बाबा ते लिहण्यासाठी नेहमीच सांगतात.त्यामुळे वकील, डॉक्टर,प्राध्यापक, इंजिनियर,अधिकारी कसा असावा. समाजपरिवर्तनासाठी कार्यरथ असणारा असावा. म्हणून हा लेखप्रपंच केला आहे. नोकरीत असतांना प्रशासकीय अनुभव आणि शासकीय योजनांची माहिती समाजातील कार्यकर्त्यांना व संस्था संघटनांना दिल्यास समाजाचा विकास व कल्याण करण्यास मोठी मदत होते म्हणूनच प्रमोद दादासारखे वकील समाजाला चळवळीला योग्य दिशा दाखविण्याचे काम करू शकतात.
शिक्षण वाघिणीचे दुध सर्वांसाठी असते?. पण अनेक लोक त्याचा वापर फक्त स्वार्थासाठी करतात.प्रशासकीय सेवेतील उच्चशिक्षित अधिकारी गोरगरिबांवर अन्याय अत्याचार करण्यास नेहमीच पुढे असतात. त्यांच्यातील शिक्षण हे वाघीनेचे दुध कुठे ही गुरगुरतांना दिसत नाही.प्रमोद दादा आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या विक्री व वसुली विशेष अधिकारी (S.R.O) म्हणून काम पाहत आहे.मुंबई पूर्व उपनगर जिल्हा बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन चे सेक्रेटरी, विबग्योर लॉ फर्म चेयरमन, समता फौंडेशन अध्यक्ष,अकॅमे नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित अध्यक्ष आहेत.त्यामुळे त्यांचे असंघटित कष्टकरी कामगारांना त्यांचे मार्गदर्शन नियमितपणे मिळते ते पुढे ही मिळत राहावे. तरुणांना प्रेरणा देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व असेच विकसित होत राहो आणि त्यासाठी त्यांचे आरोग्य निरोगी राहावे हीच अपेक्षा आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांचा मार्गदर्शक प्रमोद दादा यांच्या प्रेरणादायी यशस्वी वाटचालीसाठी त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
प्रशांत सागर तायडे,९८३३८४१३०९,भांडूप मुंबई.