खोट्या आगलाव्या व्हिडीओ-फोटो पासून सावधान!

खोट्या आगलाव्या व्हिडीओ-फोटो पासून सावधान!
===================
अमित मालवीय हा भाजपचा राष्ट्रीय आयटी इन-चार्ज आहे असं तो स्वतः ट्विटर बायोमध्ये लिहितो. या माणसाने काल रात्री अलिगढ युनिव्हर्सिटीमध्ये “हिंदूंची कबर खोदली जाईल” अशा अर्थाचे नारे दिले जात आहेत असं ट्विट केलं, त्यासोबत व्हिडीओ जोडला होता. त्यानंतर भक्त आणि चेतक मंडळींनी ते सगळीकडे फिरवलं.
.
आज दोन फॅक्ट चेकर वेबसाईट्सनी यावर रिपोर्ट केलाय. अलिगढ युनिव्हर्सिटीमध्ये असे नारे दिले गेल्याचा दावा आणि व्हिडीओ खोटा असल्याचे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. मागे जेएनयूबाबतही असेच फेक व्हिडीओ आणि गॉसिप्स फिरवले गेले होते. आणि ते याच लोकांनी फिरवले होते. जेएनयूमध्ये देशद्रोही आहेत म्हणून आता वर्षे लोटली, या कुजबुजखोरांना कोर्टासमोर कन्हैया आणि त्याचे साथीदार दोषी असल्याचे सिद्ध करता आलेले नाही. कन्हैया उजळ माथ्याने आज बाहेर फिरतो आहे. यांच्याविरोधात खुलेपणाने उभा आहे.
.
सामान्य नागरिकांना एवढीच विनंती आहे की “अमुक लोक देशद्रोही आहेत” अशा प्रकारच्या मेसेजेसवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. फोटो/व्हिडीओदेखील फेक फिरवले जातात. त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय अमुक विद्यार्थी, अमुक लोक किंवा अमुक गट देशद्रोही आहेत किंवा हिंदूंना संपवू पाहत आहेत किंवा गजवा ए हिंद वगैरे करत आहेत यावर विश्वास ठेवू नका. जाणूनबुजून पसरवल्या जाणाऱ्या असत्याला आणि द्वेषकेंद्री प्रचाराला बळी पडू नका.
● मकरंद देसाई
.
फेकुगिरी उघड करणाऱ्या लिंक्स-
१) https://www.boomlive.in/amp/factcheck/did-aligarh-muslim-university-students-raise-hinduon-se-azadi-slogans-a-factcheck-6303
२) https://www.altnews.in/no-amu-students-did-not-raise-the-slogan-hinduon-ki-kabr-khudegi/


कृपया, #आदिनामा यह पेज Like कीजिये, यहां के लेख आप के वॉल पर और ग्रुप्स पर शेअर कीजिये, आप के मित्रों को इस पेज पर Invite कीजिये.
सभार आदिनाम fB र्पज

Next Post

अकथित सावरकर पुस्तक. लेखक- मदन पाटील

मंगळ डिसेंबर 17 , 2019
अकथित सावरकर पुस्तक. लेखक- मदन पाटील ===================== “अकथित सावरकर” हे 2011 मधे मदन पाटील यांनी लिहलेले आणि कमी वेळात बहुचर्चित ठरलेले व सत्यता स्पष्ट करणारे पुस्तक. सावरकरांचा आतापर्यंत माहीत नसलेला “अकथित” व सत्य असा कार्यप्रवास लेखकाने पुस्तकात पुराव्यानिशी मांडला आहे. तसेच […]

YOU MAY LIKE ..