सांगली,सातारा,कोल्हापूर या पूरग्रस्तांना भेट देत स्वत लोकांच्या भावना समजावून घेताना वंचितांचे नेते ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर …!
महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपलब्ध राहण्याचे आवाहन केले आहे. पक्ष पातळीवर अन्न, गरम कपडे, औषधे, सॅनिटरी पॅड्स, ओडोमॉस आदी साहित्य उपलब्ध करावे’ , अशी कळकळीची विनंती सर्व कार्यकत्यांना आणि समाज बांधवांना करण्यात आली आहे.