विविध संस्था आणि संघटनांनी राबविले चैत्यभूमी परिसर स्वच्छता अभियान…..!
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लाखोचा जनसागर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात जमा होतो त्याच्या व्यवस्थापनाची चोख कामगिरी मुंबई महानगर पालिका करत असते मात्र आपल्या बांधवांच्या येण्याने जो ताण महानगर पालिकेवर पडतो त्याला सहकार्य म्हणून मुंबई आणि परिसरातील बऱ्याच स्वयंसेवी संस्था आणि संघटना आपल्या कार्यकर्त्यांसह कोणताही गाजावाजा ना करता सहभागी होतात .
मंडणगड-दापोली युवा प्रतिष्ठान ,सम्यक संकल्प सामाजिक संस्था ,वादळवारा यासारख्या अनेक सामाजिक संघटना सहभागी होतात .
सहा सात डिसेंम्बर ला विविध स्तरातील मुंबई आणि परिसरातील तरुण तरुणी कार्यकर्ते आपले योगदान या कामी कोणताही गाजावाज्या न करता अविरतपाने करत आहेत .
यात केवळ देशभरातून येणाऱ्या आपल्या बांधवांनी केलेल्या अस्वच्छता ने परिसर आणि सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये या उदात हेतूने हे तरुण काम करतात.
कोणतेही नेतृत्व यात नसून केवळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाखातर हा अखंड सेवेचा वसा चालू आहे. सुरवातीला काही मोजक्याच संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते यात सहभागी होत मात्र हा सुप्त उपक्रम बघून यात बऱ्याच तरुणांनी भाग घेतात असे मंडणगड -दापोली युवा प्रतिष्ठान चे सुनील तांबे कोंव्हलीकर यांनी सांगितले.
सर्वच थरातून या तरुण-तरुणींचे अभिनंदन करण्यात येत आहे .