महात्मा ज्योतिबा फुले(1827 -1890) एक महान युगप्रवर्तक..!


-प्रमोद रामचंद्र जाधव
ambedkaree@gmail.com

संपुर्ण भारतीय समाजात आधुनिक समाजक्रांतीचे उद्गाते आणि भारताच्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती….!

त्यांना प्रथम प्रत्येक भारतीय व्यक्तीने अभिवादन केले पाहिजे . शिक्षणासारखे शस्त्र भारतीय समाजात सहज त्यांनी उपलब्ध करवून दिले त्यासाठी ब्रिटिश सरकारच्या 1882 भारतात आलेल्या हंटर शिक्षण आयोगापुढे भरतातील शिक्षण व्यवस्थेच्या क्रांतिकारक उन्नती साठी निवेदन सादर केले .त्यात शिक्षणाचे कवाडे स्त्रियांना उघडी करा .केवळ शिक्षणाने नोकरदार व पगारदार लोक वाढतील असे नाही तर शिक्षणाचा फायदा देशातील व्यापार,उद्योग वाढीसाठी ही मदत होईल.

1882 ला शिक्षणासाठी एकाकी लढणारा हा महात्मा किती काळाच्या पुढे असेल हे त्यांच्या लिखाणाचे नमुने वाचले तर लक्षात येईल.

इतिहासाचा खरा सत्यशोधक-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे यांचा खरा इतिहास पोवाडा च्या माध्यमातून लिहिणारे त्यांनी पहिली जयंती साजरी करणारे खरा शिवशाहीर संशोधक ,आधुनिक जगाची निर्मिती करणारा युगप्रवर्तक ,स्त्रियाना खऱ्या अर्थाने स्वतंत्र बहाल करणारा जगमान्य उद्धारक….!
स्त्री ती मग कोणत्याही जातीची व धर्माची असो त्यांचे दुखणे सारखेच आहे हे जगाला सत्य उलगडून सांगणारा खरा स्त्री उद्धारक.

स्वतः उद्योगपती असून ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत त्यांच्या साठी सरकार दरबारात व समाजात न्याय मागणारा शेतकऱ्यांचा कैवारी. शेतकरी कसा भरडला जातो ,त्याच्यावर कसे अन्याय होत असतात त्याच पाढा वाचून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी उगारून शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारा सत्यशोधक.

आपल्या पाण्याचा हौद खुला करून अस्पृश्य वर्गाला पाणी देणारा खरा मानवता वादी .जातीभेद हे ब्राह्मणांनी निर्माण केले आहेत याची सत्यता दाखवणारा समाजक्रांतीसूर्य .तयांच्या गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवून अस्पृश्यचेच्या विरोधात सामाजिक क्रांती करणारा क्रांतिसूर्य.

आज त्यांचे लेखन वाचले तर अंगावर काटा उभा राहतो.काही त्यांच्या साहित्याचे फोटो आपणास देत आहे .

खंत एकच त्यांचे साहित्य आणि जीवन प्रवास पहिला ही थक्क व्हायला होते .शिक्षण म्हणजे आजचा जगण्याचा श्वास आहे तरी ही शिक्षणावर क्रांतिकारक कार्यकरणाऱ्या ह्या महात्मा फुले आजून ही उपेक्षितच आहेत.सरकार याची दखल कधी घेईल।कोण जाणे पण भारतातील प्रत्येक नागरिक त्यांच्या उपकाराची फेड कधी करेल त्या दिवसाची वाट पाहावी लागेल आणि तोच दिवस ह्या भारताचा खरा उधाराचा आणि सोन्याचा दिवस असेल.

प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com

Next Post

महात्मा फुले बुधवार पेठ आणि शेतकऱ्याचा आसूड

रवि एप्रिल 11 , 2021
 भारत हा कृषिप्रधान देश होता असे आता म्हणावे लागेल.कारण या देशातील शेतकरी तीनचार महिने कडक थंडीत देशाच्या राजधानीच्या सीमेवर जनांदोलन करतो तरी त्यांची दखल केंद्र सरकार घेत नाही.अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची आणि त्यांच्या आसुडाची आठवण येते.त्यांनी लिहलेल शेतकऱ्याचा आसूड […]

YOU MAY LIKE ..