जेष्ठ विधितज्ञ ,लोकशाहीचा प्रणेता माजी न्यायमूर्ती पी बी सावंत काळाच्या पडद्याआड..!

प्रख्यात न्यायमूर्ती आणि जेष्ठ विचारवंत,सामाजिक न्यायचे प्रणेते,महान विधितज्ञ माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.

मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. माजी न्यायमूर्ती पी बी सावंत १९८९ ते १९९५ या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय होते तसंच आग्रहानं भूमिका मांडत होते. वर्ल्ड प्रेस कऊन्सिल आणि प्रेस कऊन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिलं. तसंच यादरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं होतं.

न्या.पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र मतभेद तसंच प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित तीन सदस्यीय ट्रिब्युनलचे देखील ते सदस्य होते.

मान्यवरांच्या काही मोजक्या प्रतिक्रिया

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे देश एका महान विधिज्ञास मुकला.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/LRnZlNz66x

— Supriya Sule (@supriya_sule) February 15, 2021

माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी पी बी सावंत यांच्या निधनावर एबीपी माझाशी बोलताना भावना व्यक्त करतान सांगितलं की, “त्यांची आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते”.

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. सामाजिक समतेसाठी त्यांनी वेळोवेळी सनदशीर भूमिका घेतल्या.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/F7oe13VGea

— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2021

बिनखर्चाची निवडणूक व्हावी असं परखड मत
निवडणूक बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी कार्यकर्ते संसदेत असावेत असं पी बी सावंत यांचं मत होतं. “कोटय़वधींचा खर्च केल्याखेरीज निवडणूक जिंकता येत नाही हे सध्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या खर्चाकडे गुंतवणूक म्हणूनच पाहतात. या निवडणूक पद्धतीमध्ये बदल घडून ती बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते संसदेमध्ये प्रतिनिधी असावेत,” असं परखड मत त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.

Next Post

आंधळ्या शतकातील दोन डोळे

रवि फेब्रुवारी 21 , 2021
‘आंधळ्या शतकातील दोन डोळे’ हे पुस्तक माझ्या हातात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि नाव वाचल्या नंतर, मी या पुस्तकाला वाचण्याशिवाय राहू शकलो नाही. या पुस्तकाचे लेखन केले आहे पेशाने पत्रकार असलेल्या श्री. वसंत वाघमारे यांनी. ‘एक अभ्यासू आणि वैचारिक लेखणीतून पुस्तकाचा जन्म […]

YOU MAY LIKE ..