प्रेरणा!!! बोधिवृक्षाची

गार गार वारा आणि उंच उंच डोंगर रांगा सभोवार हिरव्या गर्द झाडीचे घनदाट तर काही तुरळक जंगल मधेच एकदा उजाड खुरट्या बुटक्या झाडांचा पुंजके असणारा माळरान….!
गर्द झाडवलीत आणि गवताच्या घिरट्यात असलेली तर काट्याकुट्याने विस्कटून गेलेली पायवाट….!
रानकोंबड्या,कावळे,कबुतरे,कवड्या ,चिमणी,फुलपाखरे,अवतीभवती घिरट्या घालणारे रानकिडे, डोक्यावर घोंघावणार्या मधमाश्यांची झुंड….!

मस्त केवड्याच्या पानाचा,जास्वंदी,करवंदी,कुंड्यांच्या पांढऱ्या ,निळ्या,जांभळ्या आणि भगव्या फुलांचा व सुकत चाललेल्या गवताच्या फुलांचा सुगंध सगळा सारा आसमंत दरवळलेला.

उंच आकाशात आपल्या सावजासाठी घिरट्या घालणारी घार तर गवताच्या झुबक्यात लपून बसलेला ससा…..आपल्या किलबिल्या तीक्ष्ण डोळ्यात जीवनमरणाचा खेळ खेळत आहे….! समोरच जांबळीच्या उंच झाडावर कोकिळा आपल्या सुमधुर आवाजाने जंगलाची शांतता अधिकच सुमधूर करत आहे….!

शांत वाऱ्याची झुळूक आणि डोक्यावर नुकताच आलेले सूर्यराज….!

वातावरण एकदम आल्हाददायक आहे मनाला उभारी देते सह्याद्रीच्या कुशीत असणारा हा वाघदरा…मुक्काम पोस्ट हर्दखळे त्याच्या माळावर असणारा बोधिवृक्ष…!

शांत,संयमी आणि प्रफुल्लित करणारी बोधिवृक्षाच्या पानांची सळसळत नवी प्रेरणा आणि आशा देते…!
जगण्याची आणि दुसऱ्यास जगवण्याची..!
-प्रराजा

Next Post

जेष्ठ विधितज्ञ ,लोकशाहीचा प्रणेता माजी न्यायमूर्ती पी बी सावंत काळाच्या पडद्याआड..!

सोम फेब्रुवारी 15 , 2021
प्रख्यात न्यायमूर्ती आणि जेष्ठ विचारवंत,सामाजिक न्यायचे प्रणेते,महान विधितज्ञ माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ […]

YOU MAY LIKE ..