30 जानेवारी 1948 ला गांधीजींची हत्या झाली ते, वृत्त “ईविनिंग न्युज” मधे मुख्य वृत्त म्हणून छापलं गेलं. त्यावेळी बाबासाहेबांचा तब्बल 25 वर्ष सहवास लाभलेले सोहनलाल शास्त्री यांनी सर्वप्रथम बाबासाहेबांना ते वृत्त सांगितले, ते म्हंटले “आज बिरला हाऊस मधे गांधीजींची एका गोडसे नामक महाराष्ट्रीय ब्राम्हणाने गोळी मारून हत्या केली.” बाबासाहेब ही बातमी एकूण एकदम शांत झाले. उदास झाल्याची लक्षणं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसली, बाबासाहेब इंग्रजीत उद्गारले “It is not good to be too good (अत्यंत चांगल असण सुद्धा चांगल नसत)” असे सोहनलाल शास्त्री लिहितात. बाबासाहेब पुढे म्हंटले की अस कृत्य फक्त महाराष्ट्रीयच करू शकतो, महाराष्ट्रीय अर्थात ब्राम्हण विद्वान सुद्धा आहे आणि उपद्रवकारी सुद्धा. विशेषतः चित्पावन ब्राह्मण ज्यांच्या पूर्वजांनी पेशवे राहून राज्य केलेलं आहे आणि त्यांच्यात बाळ गंगाधर टिळक, केळकर, डॉ. काणे, डॉ. कर्वे, आगरकर, सावरकर, गोखले पंडिता रमाबाई इत्यादी प्रसिद्ध देशभक्त आणि विद्वान सुद्धा झाले आहेत. बाबासाहेब म्हणायचे की गांधीजींची हत्या महाराष्ट्रीय शिवाय कुठल्याही प्रांतातला कुठलाही हिंदु करण्याचे दुस्साहस करू शकत नाही.
गांधीजींच्या हत्येचे पडसाद सुद्धा महाराष्ट्रात अधिक उमटले. ब्राम्हणेतरांनी (मराठा) पश्चिम महाराष्ट्रात शहरी तथा ग्रामीण भागात ब्राम्हणांना मारले, लुटले. त्यांची घरं जाळली गेली. यात ब्राम्हणाद्वारे गांधीजींची हत्या हा तर केवळ बहाणा होता. वस्तुतः ब्राम्हणेतरांच्या मानत ब्राम्हणांच्या विरोधात प्रतिशोधाची जी आग आतल्या आत जळत होती तिचा या घटनेने भडका झाला. अशावेळी वयोवृद्ध ब्राम्हणांचा एक समूह बाबासाहेबांकडे आला आणि ढसाढसा रडायला लागला की मराठ्यांनी आम्हाला उध्वस्त केलं. बाबासाहेबांनी त्यांचं करूणाक्रंदन ऐकुन म्हंटले “हे जे काही झालं, ते ऐकुन मला अतिशय दुःख झालं. परंतु मी हे म्हंटल्या शिवाय नाही राहू शकत की जाती पतीचे जे विषवृक्ष तुमचे ब्राम्हण पूर्वज पेरून गेले, हे त्याचेच विषारी फळ आहेत जे आता तुम्हाला चाखावे लागत आहेत.” एका ब्राम्हण नेत्याला उद्देशून बाबासाहेब म्हंटले “मी जेव्हा काळाराम मंदिरात प्रवेश करू इच्छित होतो आणि महाडच्या तळ्यात आपल्या लोकांना पाणी मिळावं म्हणून आंदोलन करत होतो तेव्हा तुम्ही आमच्या या सत्याग्रहाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार केला नव्हता का? मराठा आणि इतर लोकांना तुम्ही मला जिवे मारण्यासाठी नव्हत भडकवल का? मी तुम्हाला तेव्हाच म्हंटलो होतो की ह्या जाती पातींच्या आणि उच-नीचतेच्या भिंती काढून टाका. सगळ्यांसोबत समतेचा व्यवहार करा नाहीतर एक दिवस असाही येऊ शकतो की तुम्ही भडकवलेले ब्राम्हणेतर तुमचाच सर्वनाश करतील. सांगा मी बोललेल आज सिद्ध झालं की नाही.” तो वृध्द ब्राम्हण डोळ्यातून अश्रू काढत बोलला, “तुमचं सगळ म्हणणं सत्य होत, तुमची भविष्यवाणी सत्य झाली”.
त्याच काळात गुरु गोळवलकर सुद्धा बाबासाहेबांकडे आले. त्यांच्या हातांच्या दहाही बोटांत वेगवेगळ्या प्रकारच्या पशानजडित सोन्याच्या अंगठ्या घातलेल्या होत्या. बाबासाहेब सोहनलाल शास्त्रींना म्हंटले की “हे कुणी धनिक व्यक्ती नाहीत, परंतु सोन्याच्या हिरेजडित अंगठ्या त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुदक्षिणा पूजेत दक्षिणा म्हणून मिळाल्या आहेत. बघा या देशात पोप एक नाही दोन नाही दहाही बोटांत दहा प्रकारच्या अंगठ्या घालून आहेत. अशे गुरु जर देशात असतील तर त्याच कधीही कल्याण होणार नाही.”
गोळवलकरांच बाबासाहेबांना म्हणणं होत की मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी मराठाएतर सर्व जातींनी संगठित व्हायला हव. आज त्यांनी ब्राम्हणांवर अत्याचार केले ते उद्या अस्पृश्यांवर सुद्धा होतील. मराठ्यांच बहुसंख्य असन आणि भुस्वामित्व बळ हे मराठाएतर सर्वांना संपवून टाकेल. मी याचा उपाय शोधण्यासाठी आपल्याकडे आलो आहे.” यावर बाबासाहेब गोळवलकरांना म्हंटले, “तुम्ही चित्पावन ब्राम्हण आहात, तुमच्या पूर्वज पेशव्यांच्या हाती जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांनी आम्हा अस्पृश्यांना कसे वागवले? पेशव्यांनी अस्पृश्यांना “गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू” बांधून चालण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून त्यांच्यामुळे इतरांना, विशेषतः ब्राम्हणांना विटाळ होऊ नये. महाराष्ट्रात जी आग लागली आहे, ब्राम्हणांची घरे जाळली जात आहेत ते केवळ गांधीजींचा हत्यारा नथुराम गोडसे चित्पावन ब्राह्मण जातीचा आहे म्हणून? तुमचा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा ब्राम्हणांचच संगठन आहे. यात ना महार आहे ना मराठा. तुम्ही आता कुठे तुमच्या पूर्वजांनी पेरलेल्या विषवृक्षाचे विषारी फळे चाखत आहात, आता तुम्ही अजून सांप्रदायिक विषवृक्षे पेरण सुरू केलं आहे. याचाही फार वाईट परिणाम निघणार आहे. तुम्हाला जर संघ बनवायचा आहे तर तो जाती पाती संपवण्यासाठी बनवा, वर्णव्यवस्थेचा नाश करण्यासाठी संगठन बनवा. आता आधीच्या चुका सुधारा. अशे संघ काही पुन्हा तुम्हाला चित्पावन राज आणून देऊ शकणार नाहीत.” कदाचित वर्णव्यवस्थेचे, जातिव्यवस्थेचे आणि पेशवाईचे समर्थक असलेले हे गोळवलकर गप्प होऊन बाबासाहेबांचं सगळ बोलण ऐकत राहिले परंतु यापैकी कुठल्याही गोष्टीच उत्तर दिल्याशिवाय उठून निघून गेले.
(हे सविस्तररित्या सोहनलाल शास्त्री यांच्या “बाबासाहेब डॉ. आंबेडकर के संपर्क मे 25 वर्ष” या पुस्तकात पान क्र. 52 ते 55 मधे लिखित आहे.)
(सभार मुकूल निकाळजे यांच्या fb वॉल वरून )