“२२ प्रतिज्ञा अभियानने” महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित केले अभिवादन!!

समाजात अंधश्रद्धा व इतर अवैज्ञानिक गोष्टींवर जनजागृती करणाऱ्या व बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या २२ प्रतिज्ञा अभियान यांच्या वतीने कामोठे येथील संस्थेच्या कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना २२ प्रतिज्ञा अभियानाचे प्रमुख कार्यकर्ते.

२२प्रतिज्ञा अभियान कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रम संपन्न

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाचे नियम पाळून काही मोजक्याच प्रचारकांच्या माध्यमातून २२प्रतिज्ञा अभियान अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कामोठे, नवी मुंबई येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Adv. चौधरी सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच २२प्रतिज्ञा मुख्य प्रचारक Er. अश्विनकुमार धसवाडीकर सर आणि विनोद वासेकर सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर सार्वजनिकरित्या २२प्रतिज्ञानचे वाचन करण्यात आले. ६ डिसेंबर हा एक संकल्प दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अपूर्ण राहिलेले कार्य आपल्या श्वासाच्या अंतिम क्षणा पर्यंत पूर्ण करण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे त्यामुळे २२प्रतिज्ञा अभियान अंतर्गत “संकल्प पत्रा” द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

उपस्थित Adv. चौधरी सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार मांडले, तसेच २२प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक Er. जीवन कांबळे सर, विनोद वासेकर सर आणि Er. अश्विनकुमार धसवाडीकर सर यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच २२प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक विनोददादा पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमाचे निवेदन २२प्रतिज्ञा अभियान महाराष्ट्र प्रमुख प्रदिप जाधव यांनी केले. या कार्यक्रमास Adv सोनाली तेलंग , स्वप्नील धनावडे उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा बुद्धांच्या विचारांच्या प्रचार व्हावा तसेच बहुजन तारक सर्व महापुरुष व त्यांचे विचार घरो घरी पोचावे या करिता २२प्रतिज्ञा अभियान अंतर्गत “२२pratigya Abhiyan” हे Youtube चॅनेल सुरू करण्यात आहे. या अभिवादन कार्यक्रमाचा सांगता विनोद वसेकर सर आणि विनोददादा पवार यांच्या सुमधुर आवाजात गीतांच्या माध्यमातून करण्यात आला.

विनोद पवार-२२ प्रतिज्ञा अभियान प्रमुख प्रचारक कल्याण

Next Post

महापरिनिर्वाण दिन जगभरातील करोडो अनुयायांनी आपल्या उद्धारक नेत्याला केले भावपूर्ण अभिवादन केले!!!

सोम डिसेंबर 7 , 2020
जगाला न्याय समता बंधुता स्वातंत्र्य याचा मूलमंत्र देणारे महामानव ,भारतातील शोषित,पीडित जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले सर्वस्व बहाल करून करून न्याय आणि कायद्याची कवचकुंडले देणारा उद्धारक,प्रतिकूल परिस्थितीत आपल्या प्रचंड ज्ञान जिद्दीने ज्ञानसंपादनकरून जगातील सर्व पदव्यासंपादन करून प्रकांड पंडित म्हणून जगात पहिला […]

YOU MAY LIKE ..