।। तो सूर्यही कधीचा .. ।। -वसंत वाघमारे
जगण्यात दंभ का रे, आयुष्य विराम आहे
कर कुशल कर्म थोडे, बाकी हराम आहे ||
पळती कुठेवरी हे, सोडून ज्ञान वाटा
पाईक हो भिमाचा, ते ज्ञान धाम आहे ||
व्यवहार थांबले अन, असहाय जीव झाले
कैसे विकास होई, विपरीत काम आहे ||
भेटून घ्या जरासे, भेटून काल आलो
तो सूर्यही कधीचा, भेटीस ठाम आहे ||
सरकार आत्मनिर्भर, घालून गंड लोका
नाही कधी कुणाच्या, पदरात दाम आहे ||
-वसंत वाघमारे -संपादक प्रबुद्ध नेता ,नवी मुंबई
नायकांचा तुच महानायक!!-दादासाहेब यादव
बाबा तु बहीष्कृतांचा “मुकनायक” झालास
तु केलेल्या गर्जनेनं,
मुक्यांना शब्द मिळाले,
अन् वेदनांना आवाज फुटला!
आता ते शब्द न् शब्द
ओळीओळीत ओरडत सुटलेत
तुझे शब्द वेदनांचे हुंकार होताच,
त्यांची स्फुर्तीगीते झाली,
तुझ्या घोषणेने,
त्यांच्यातल्या ज्वालामुखिचा ऊद्रेक होतो,
प्रतिशोधाच्या लाव्हारसातुन,
क्रांतीच्या अंगारांचे धुमारे फुटु लागतात,
आम्हा नायकांचा तुच महानायक,
गावकुसाबाहेरची माणसं,
आम्ही सैनिक ,भिमसैनिक,
तुझ्या लढ्यालढ्यातुन ऊगवलेल्या स्फुर्तीतुन,
तुझ्या पश्चातही अनेक आंदोलन झाली,
योणार्या पिढ्या न् पिढ्या,
तुझाच ऊद्घोष करतील,
माझ्या कवितेच्या आभाळाला,
तुझेच शब्द मिळाले!!
तुझेच शब्द मिळाले!!!
दादासाहेब यादव,मुक्तपत्रकार 9167361545
संघर्ष निवास,कडधे,मावळ,पुणे.
हा श्वास माझा!!!! -प्रमोद रा जाधव
हा श्वास माझा,
ही स्पंदने ही तुझीच…!,
आकाश स्वातंत्र्याचे,
तुच दिलेस,
तुच दिलेस बळ पंखांना,
तुच अंधारयुगाची
तोडलीस बंधने,
अन अगणिक पेरणीस
सुर्य किरणे प्रकाशाची ,
प्रगतीकडे झेपावणारी…!
लाखो धमन्यात वाहतो,
तुझ्या सम्यक विचारांचा
तेजस्वि प्रवाह …!
न थाबणारा न संपणारा…!
महापरिनिर्वाण दिनी..
करितो विनम्र अभिवादन.!
तुझा चरणी
“संकल्प “
तुझ्या विचाराचा करित…!
तुझ्या स्वाप्नातील
“प्रबुध्द भारत “
निर्मिण्याचा घडवण्याचा….!
—प्रमोद रामचंद्र जाधव(प्रराजा)
www.ambedkaree.com