भारतात नव्हे तर जगात असा स्मृतीं दिन कोणाचा साजरा होत नसेल.त्यांची जागतिक पातळीवर दरवर्षी नोंद घेतली जाते,गिनिज बुकात नोंद झाली असेलच.यावर्षी कोरोनाच्या महामारीने लॉक डाऊन असल्यामुळे अनेक गोष्टीवर प्रतिबंध आले आहेत.दळणवळणाच्या वाहनावर मनाई केली आहे. सर्वात मोठी सार्वजनिक सेवा रेल्वे दरवर्षी विशेष मेल,एक्सप्रेस गाड्या सोडून नागरिकांची दखल घेते ती यावेळी बंद असणार आहे. त्यामुळेच लाखो भिम अनुयायी यावर्षी दादरच्या चैत्यभूमी शिवाजी पार्क वर दिसणार नाहीत. तरी त्यांची नोंद स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीपर्यंत घ्यावी लागणार आहे.
शहरातील सुशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी जात लपवून राहणारे, चैत्यभूमी दादरला येतांना शंभर अडचणी सांगतात. त्यातील बहुसंख्य लोक पांच डिसेंबर रात्रीच सफेद वस्त्र परिधान करून अभिवादन करण्यासाठी येतात.म्हणजे दिवसा कोणी ओळखीवाला भेटू नये.त्याच बरोबर सहा डिसेंबरला कामावर हजर राहून आम्ही त्यातले नाही हे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करतात. पण कागदावर जात लपविता येत नाही.
जातीच्या सवलती घेण्यासाठी सर्वात पुढे आणि वैचारिक निष्ठा नाही म्हणूनच मी म्हणतो माझा असंघटित शेतमजूर, कामगार कर्तृत्ववान नसला तरी निष्ठावंत आहे.
मग शिक्षण घेतांना नोकरीवर लागताना सवलत घेणारा कर्तृत्ववान नसला तरी चालले पण निष्ठावंत पाहिजे.खेड्या पाड्यातील हा असंघटित शेतमजूर शिवाजी पार्कला आजूबाजूच्या रस्त्यावर झोपायला जागा नसली तरीही अस्तव्यस्त पडलेला असतो. अंथरुण नाही अन पांघरुणही नाही. कडाक्याची थंडी शौचालयाची अपुरी व्यवस्था. रात्रभर जागून भिमगिते. गाणारे.पुस्तके,फोटो,मुर्त्या,कॅलेंडर यांचे स्टॉल पाहणी करून खरेदी,विक्री करणारे सर्वच असंघटित आहेत.
देशभरातुन आलेला निष्ठावंत भिमसैनिक,अनुयायी कोणाच्या सांगण्यावरून दादर चैत्यभूमीला येत नाही.इथे आल्यावर तो प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर नतमस्तक होतो,समुद्राच्या वाळूत बनविलेल्या शिल्पा समोर हारफुल मेणबत्ती,अगरबत्ती अर्पण करून त्रिवार वंदन करून वंदना म्हणतो.नंतर तो त्यांच्या आवडी नुसार सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय नेतेच्या सभामंडपा समोर हजेरी लावतो.कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे तसे नेते सुध्दा आहेत.
असंघटित कष्टकरी शेतमजूर, इमारत बांधकाम कामगार, नाका कामगार,घरकामगार,कचरा वेचक,फेरीवाला यांच्या न्याय हक्का साठी लढणारे अनेक कार्यकर्ते आहेत. तेच या लोकांच्या संकट समयी उपयोगी पडतात.तेच कार्यकर्ते कोणत्यानां कोणत्या नेत्यांचे निष्ठावंत असतात. मग हेच कार्यकर्ते या असंघटित शेतमजूरांना कामगारांना त्यांच्या दावणीला बांधतात.म्हणूनच सहा डिसेंबरला चैत्यभूमी दादरला येणार हा असंघटित शेतमजूर कामगार दरवर्षी कमी होण्या ऐवजी तीनचार पटीने वाढत आहे.त्याला रोखण्यासाठी अनेक वेळा अनेक संकटे निर्माण केली गेली.पण तो थांबला नाही. यावर्षी कोरोनाच्या भीती मुळे त्यांनी थांबले पाहिजे.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तो थांबला तरी त्यांची सर्व ठिकाणी नोंद होणार आहे. हे मात्र निश्चित आहे.
त्याला आज पर्यत अनेकांनी फसविले आहे.पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्याला न्याय हक्क मांगण्याचा अधिकार आहे हे जो जाणतो तो अन्याय, अत्याचार सहन करून पुन्हा पुन्हा संघर्षाची लढाई लढण्यासाठी सज्ज होतो.गुजरात,राजस्थान आणि बिहारच्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी खूप मार खाल्ला त्यांच्या समर्थनात देशभरातील मागासवर्गीय विशेष आंबेडकरी चळवळीतील लोक उभे राहिले,त्यामुळेच कधीच मुंबईतील चैत्यभूमी न पाहिलेले गुजरात,राजस्थान, आंध्रप्रदेश,कर्नाटक, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि बिहारच्या मागासवर्गीय समाजाची संख्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक चैत्यभूमी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वाढत आहे.
असंघटित मागासवर्गीय समाज मोठया संख्येने उपस्थित होऊन तीन दिवस भारावून जातो.तेव्हाच तो ठरवितो मी या पुढे दरवर्षी चैत्यभूमी दादरला माझा समाज बांधवांना जास्तीतजास्त संख्येने घेऊन येईल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक दाखवेल.म्हणूनच माणसं कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे.
आता पर्यत त्यांनी देवाच्या देवीच्या जत्रा पाहिल्या होत्या जेव्हा दादरच्या शिवाजी पार्कची बुक स्टोल,भोजनदान करणारे विविध बँका,रेल्वे,माझगाव डॉक,भारत पेट्रोलियाम,हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियल ऑइल, रिफायनरी, स्वतंत्र मजदूर युनियन, मागासवर्गीय विद्युत कामगार संघटना,महानगरपालिका कामगार संघटना, सत्यशोधक कामगार संघटना, विद्यार्थी संघटना विविध कामगार कर्मचारी युनियनचे मंडप पाहिले तेव्हा खूप प्रमाणात प्रभावीत झाला.आणि आजूबाजूच्या परिसरातील फुले शाहू,आंबेडकर विचारांचे विविध साहित्य,मुर्त्या फोटो, पेन दिनदर्शिका, टी शर्ट,टोप्या त्या खरेदी करताना बहुसंख्येने असंघटित कष्टकरी माणसं हे नवीन माणसासाठी खूप प्रेरणादायी ठरते.
ही प्रेरणा घेऊन तो आपल्या गावी जातो तेव्हा त्याने जे पाहिले त्यांच्या पेक्षा जास्त सांगतो.म्हणूनच महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यातील असंघटित माणसा पेक्षा इतर राज्यातील असंघटित मागासवर्गीय समाज मोठया संख्येने उपस्थित होऊन तीन दिवस भारावून जातो.तेव्हाच तो ठरवितो मी या पुढे दरवर्षी चैत्यभूमी दादरला माझा समाज बांधवांना जास्तीतजास्त संख्येने घेऊन येईल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक दाखवेल.म्हणूनच माणसं कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे.
शिवाजी पार्क दादरला केवळ आंबेडकरी चळवळीतील माणूसच येतो असे म्हणणे चूक ठरेल.या लोकांची गर्दी पाहण्यासाठी त्यातील ऊर्जा शक्ती पाहण्यासाठी अनेक दिग्गज पत्रकार,साहित्यिक,विचारवंत येतात.अनेक पुस्तक स्टोल्सनां भेटी देतात,पुस्तके, ग्रंथ खरेदी करतात.आणि म्हणतात खरच या गोरगरीब कष्टकरी लोकांची खूप निष्ठ आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर.काय मिळतं म्हणून येत नाही, तर आयुष्यात जे जे मिळालं ते ज्या महामानवामुळे मिळालं त्याला अभिवादन करण्यासाठी किती ही त्रास झाला तरी आम्ही अभिवादन करण्यासाठी येणारच!.असे पुण्यकर्म करणारा माणूस देशात नव्हे जगात झाला नाही.
पहिल्याच वर्षी हजारो, दुसऱ्या वर्षी शेकडो लोकांनी स्मृतिदिन आठवणीत ठेऊन साजरा केला, तिसऱ्या वर्षी राज्यात देशात मनुस्मृती नुसार वागणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे पक्षाचे लोक सत्ताधारी असतांना ही फारसा बदल झालेला नाही.पुढे सत्ताधारी झाल्यावर ही जनतेत काही बदल जाणवला नाही.कर्तृत्ववान असलेल्या तमाम सहा हजार सहाशे जाती पोटजातीत विभागलेल्या ज्वलंत हिंदुत्ववादी लोकांनी निष्ठावंत सैनिक म्हणून निष्ठा का नाही दाखविली?.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाची गर्दी कमी होतांना दिसत नाही उलट वाढतांना दिसते.हजारो गटात,संस्थेत संघटनेत आणि राजकिय पक्षात विभागलेला हा गोरगरीब कष्टकरी असंघटित समाज बाबाचे उपकारांची जाणीव ठेवून दरवर्षी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतो.बाबा तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही. असे मान्य करून नतमस्तक होतो.६४ वर्षा नंतर ही सैनिकात, अनुयायात,भक्तात,शिष्यात,पत्रकारात,साहित्यिकात,विचारवंतात मोठी भर पडत चालली आहे. म्हणूनच मी दरवर्षी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने लिहतो.
या लक्षवेधी गर्दीवर, करोडो रुपयांच्या पुस्तक,मूर्ती,फोटो आणि प्रेरणादायी साहित्य निर्मितीसाठी पैसा टाकून तीन दिवसांत वसूल करणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील गोरगरीब कष्टकरी असंघटित समाज कोणत्याही क्षेत्रात पुढे गेला नसेल पण तो कोणत्याही क्षेत्रात मागे ही नाही.
ते अपेक्षा पेक्षा कर्तृत्ववान व निष्ठावंत आहेत.फक्त त्यांचा कोणाचा कोणाला एकूण हिशोब नाही,ऑडिट रिपोर्ट नाही.खरच या लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारतीय संविधान वाचले आणि त्यांची प्रामाणिक पणे अंमलबजावणी केली तर काय होईल?.
मग कोणी म्हणेल कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे.आणि त्यांची यावर्षी सुद्धा वेगळी महापरिनिर्वाण दिनाची गिनीज बुकात नोंद होणार!.आणि झालीच पाहिजे.कोरोनाचे संकट लक्षात घेऊन घरात गांवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला क्रांतिकारी विचारांना त्रिवार वंदन करा,अभिवादन करा आत्मचिंतन करा.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,