थोर तुझे उपकार महात्मा!!!
थोर तुझे उपकार महात्मा ,थोर तुझे उपकार,
जन्म घेवुनी झिजलासी तु करण्या परोपकार.
शेंणशिंतोडे कर्मठांची,झेललासी दगडमाती,
उध्दारण्या बहुजन शुद्रादीशुद्र भारतज्ञाती.
कसब ब्राम्हणाचे,गुलामगीरी,अखंड,आसुड शेतकर्यांचा,
सत्यशोधण्या मानवतेचे विनाश केला धर्मांध विषमतेचा.
दिले ज्ञान अंधकार करण्या,दूर दुरितजनांचा,
कोटी कौटी हृदयात चेतला ज्वाला विद्रोहाचा.
कोण शिवाजी ? कोणता राजा ?काय कुणाला ज्ञात ?,
तुच शोधलेस मुळतयाचे, पवाडे अखंडित स्वराजाचे गात.
वेद पुराण फेकले तु, तू खुले केले बंद पाणी,
विद्रोहाचे मुळ तु समतेचा अन ममतेचा मेरुमणि.
आज करितो विनम्रपणे प्रणाम तव स्मृतीस,
नसे तोड जगती महात्मा तव महान कार्यांस..!.
——प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com