राजा – मुंबई न. ७० @ बाबासाहेबांची कोर्टाची फी आणि उद्योगपती वाडिया..

बुद्ध कॉलनीच्या इतिहास तसा खूप रोमांचक आहे. जुनी जाणती वृद्ध मंडळी नेहमी आम्हाला स्फूर्तिदायक इतिहास लहानपाणी सांगत असत. कुर्ला रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्लॅटफॉर्म न. एकवर मुख्य गेट मधून दोन रस्ते निघतात. एक रास्ता सरळ बाजारपेठेतून निघून आडव्या झालेल्या न्यू मिल रस्त्याला जाऊन मिळतो. ह्या बाजारपेठेला तंबाखू लेनही म्हणतात. दुसरा रस्ता डाव्या बाजूने वळण घेत कुर्ला अंधेरी ह्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळतो.पुढे दहा मिनिटाच्याच अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजूला आमची ही वस्ती सुरु होते. इंग्रजांच्या काळात हा पूर्वी मैदानी भाग होता. काही भागात पारश्याची फुलशेती होती. रस्त्याच्या डाव्या बाजूला भला मोठा डोंगर आणि त्याच्या पायथ्याला पारशी आणि ज्यू लोकांचे बंगले होते. ह्याच भागात एका कौलारू इमारतीत कोर्ट आणि इस्राईल लोकांचं प्रार्थना स्थळ होत. त्याला ” इस्राईल बने चर्च ” असं म्हणतात. हे चर्च अजूनही तिथे जसच्या तस उभं आहे . इंग्रजांच्या काळात ह्याच कोर्टात काही खटले चालायचे. कालांतराने ह्या कोर्टाच स्थलांतर सध्याचा आग्रा रोडवरील सध्याच्या कुर्ला कोर्टात झालं. स्वातंत्र्यापूर्व काळात मैदानी भागाच्या कडेने पवई तानसा तलावातून मुंबईला पाणी पुरवण्यासाठी मोठी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु झालं होत. ह्या पाईपलाईनचा पाया बनवण्यासाठी लागणार साहित्य म्हणजे दगड, रेती सिमेंट इथूनच विविध भागात पोहचवले जायचे. छोट्या ट्राम रूळावरून हाताने ढकलायचा ट्रॉल्या मजूर लोक सामान भरून इच्छुक स्थळी पोहचवत असत. काही महार मजूर मंडळीही इथं काम करीत होती. ही सगळी मजूर मंडळी नाशिक जिल्ह्यातून इथे पोट भरायला आली होती. आपली काम करून इथेच लाकडाची खोपटी बनवून ते मैदानात राहत असत.
ह्याच काळात एका खटल्याच्या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर येथील कोर्टात येत असत. आपला भाग्य विधाता,आपला देव समोरच्या कोर्टात येतो ही खबर एक दिवशी येथील मजूर मंडळीना कळली. मग काय त्यानंतर बाबासाहेब ज्या वेळी कोर्टात येत असत त्या वेळी ही सर्व मंडळी आपल्या हातातली सर्व काम टाकून बाबासाहेबांचं लांबूनच दर्शन घ्यायला कोर्टाबाहेर उभी राहू लागली. बाबासाहेब त्यांची केस आटोपली की घाईघाईत आपल्या मोटारीत बसून निघून जात असत. एके दिवशी ह्यातील जातीने महार असलेल्या काही दहा बारा मजूर मंडळींनी निश्चय केला की कसल्याही परिस्थितीत आपण बाबासाहेबाना समोरा समोर भेटायचं. त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायचे.काही दिवसाने नेहमीप्रमाणे बाबासाहेब कोर्टात आले. बाबासाहेबांच्या खास मोटारीमुळे लगेचच ही खबर त्या महार मजूर मंडळीना कळली. मग काय आहे त्या अवस्थेत सगळी कामे टाकून ह्या मंडळींनी कोर्टाकडे धाव घेतली. काही जणांनी जवळच असलेल्या फुलांच्या शेतीतून गुलाबाची फुल आणली.

“बाबा,आम्ही इथं पाईपलाईन टाकण्याच्या कामावर मजूर आहोत. आम्ही इथंच बाजूला झोपड्यामध्ये राहत असतो. इथल काम संपल्यावर आम्ही जिकडे काम असेल तिकडे निघून जाऊ. फकस्त तुमचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. असं बोलून त्याने आपल डोक त्याने महामानवाच्या चरणी ठेवल. त्याच क्षणी बाबासाहेब त्याच्यावर जोरात खेकसले आणि त्याला खांद्याला धरून उठवत म्हणाले “आज पाया पडलायस, पुन्हा कोणाच्या पाया पडायचं नाही. कोणासमोर झुकायच नाही. ह्या झुकण्यानेच आपण आपलं अस्तित्व गमावून गुलाम बनलोय.”
त्या महामानवाने त्याच्या हातातली गुलाबाची फुले घेऊन सर्वांची मोठ्या प्रेमाने,आत्मीयतेने चौकशी करून आपल्या मोटारीत बसून निघून गेला. पुढे ज्या वेळेला ते ह्या कोर्टात येत होते त्या वेळेला ह्या मंडळींना ते भेटत असत.

करपटलेले चेहरे, डोक्याला फाटक मुंडासे (फेटा) , शरीर उघडे बंब आणि खाली अर्धवट नेसलेल फाटलेल धोतर घातलेली ही मंडळी बाबासाहेबांच्या मोटारीजवळ दबा धरून बसली. त्यांची बाहेर येण्याची वाट पाहू लागली. कोणी काय बोलायचं हे आगोदरच ठरलेलं. सगळे शांत होते. सगळ्यांचे डोळे त्या कोर्टाच्या मुख्य दरवाजाकडे लागलेले .. प्रत्येक क्षण त्यांच्या साठी महत्वाचा होता. एका बाजूला सुपरवायजरला आता येतो सांगून येणारी मंडळी एक तास झाल्याने काळजीत बुडाली होती. एका बाजूला पोट , एका बाजूला त्यांच्या येणाऱ्या दहा पिढ्यांचा उद्धारक…, काय करायचं? कोणाला काही सुचत नव्हतं..मनाची चलबिचल आणि वरतून उन्हाची कायली ह्या मुळे त्यांना काही सुचत नव्हत.इतक्यात खटला संपवून बाबासाहेब बाहेर आले. त्यांना पाहताच गाडी जवळील सर्व मंडळी पटापट उभी राहिली, त्यांची हालचाल सुरू झाली.. बाबासाहेब एक एक पाऊल मोटारीच्या दिशेने पडू लागले. महामानवाचा तो रुबाब, ती जरब, ते ऐटदार चालणं , तो पेहरराव आणि ते राजबिंबड रूप जसजस जवळ येऊ लागल तसतशी ही मंडळी आणखीनच भांबावून गेली. सगळे निशब्द…. शांतता ” बाबासाहेब आपल्याशी बोलतील का? नाही बोलले तर ? ना.. ना प्रकारचे प्रश्न ह्या मजुरांच्या मनात येऊ लागले.

आणि एकदाचे बाबासाहेब मोटारीजवळ आले. त्यांचं लक्ष लगेचच ह्या मंडळींवर पडलं. त्यांचा अवतार आणि घाबरलेली अवस्था पाहून बाबासाहेबही जागीच थांबले आणि कडक शब्दात त्यांना विचारणा केली “काय रे? काय पाहिजे” ? बाबासाहेबांच्या दम दिल्या सारक्या भारदस्त आवाजाने सगळेजण गोंधळून गेले. त्या मुळे कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं.
इतक्यात हातात गुलाबाची फुल घेऊन एक मजुर मोठ्या धीराने हात जोडून बाबासाहेबाजवळ आला आणि म्हणाला.. “बाबा,आम्ही इथं पाईपलाईन टाकण्याच्या कामावर मजूर आहोत. आम्ही इथंच बाजूला झोपड्यामध्ये राहत असतो. इथल काम संपल्यावर आम्ही जिकडे काम असेल तिकडे निघून जाऊ. फकस्त तुमचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. असं बोलून त्याने आपल डोक त्याने महामानवाच्या चरणी ठेवल. त्याच क्षणी बाबासाहेब त्याच्यावर जोरात खेकसले आणि त्याला खांद्याला धरून उठवत म्हणाले “आज पाया पडलायस, पुन्हा कोणाच्या पाया पडायचं नाही. कोणासमोर झुकायच नाही. ह्या झुकण्यानेच आपण आपलं अस्तित्व गमावून गुलाम बनलोय.”
त्या महामानवाने त्याच्या हातातली गुलाबाची फुले घेऊन सर्वांची मोठ्या प्रेमाने,आत्मीयतेने चौकशी करून आपल्या मोटारीत बसून निघून गेला. पुढे ज्या वेळेला ते ह्या कोर्टात येत होते त्या वेळेला ह्या मंडळींना ते भेटत असत.

बाबासाहेब ह्या कोर्टात सुप्रसिद्ध उद्योगपती वाडिया ह्यांचा एक जमिनीचा खटला लढण्यासाठी येत असत. त्या काळी बहुतेक मुंबई उप- नगतील जागा ह्या उद्योग पती वाडिया ह्यांच्याच  होत्या. अजूनही कुर्ल्यामध्ये वाडिया इस्टेट नावाचा एक मोठा विभाग आहे. पुढे काही  दिवसांनी ह्या 

खटल्याचा निकाल लागला.खटल्याचा निकाल वाडिया ह्यांच्या बाजूने लागला. खटल्याची राहिलेली फी देण्यासाठी वडियानी बाबासाहेबांना विचारना केली. फी संदर्भात मग बाबासाहेब वाडियाला म्हणाले ” वाडिया साहेब , ज्या कोर्टात मी तुमच्या बाजूने हा खटला लढला अगदी त्याच्या समोरच एक जमिनीचा पट्टा आहे. तो पट्टा तुमच्याच मालकीचा आहे. आणि मला तो पट्टा पाहिजे. जमत नसेल तर मला तो भाड्याने द्या…
खेडोपाड्यातून कामासाठी, मोलमजुरीसाठी मुंबईत येणाऱ्या माझ्या गरीब लोकांसाठी मला तिथं घर बांधन्यासाठी ती जागा हवी आहे. माझी ही फी तुम्हाला परवडत नसेल तर ती जागा मला भाडेतत्वार दिली तरी चालेल.
उद्योगपती वाडियाने कसलेही आडेवेडे न घेता स्वखुशीने ही जमीन बाबासाहेबाना फी म्हणून देऊन केली.
बाबासाहेबानी मग त्या कोर्टात भेटीला आलेल्या महार मजुरांना योग्य मार्गदर्शन करून तिथे घर बांधायला सांगितली. ह्या दहा बारा लोकांनी पुढे इथे चाळी बांधल्या आणि नाशिक जिल्ह्यातील आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना बोलावून त्या भाडे तत्वावर दिल्या.
पुढे ह्या जागेचा विस्तार झाला … आणि तीच पुढे कुर्ला बुद्ध कॉलनी म्हणून प्रसिद्ध झाली.. आंबेडकरी चळवळीच मुख्य केंद्र. बालेकिल्ला, आरे ला कारे म्हणणारी ., मुंबईतील गुन्हेगारी जगतातील कुठलीही गॅंग असो , मग ती R , G असो की D आसो…
म्हातारा रुपवतेबाबाच नेहमी चाळ मालकांशी भांडण व्हायचं तेव्हा तो म्हणायचा …. “अरे गाबरा (नाशिकची एक शिवी).
माझ्या बाबासाहेबाची फी आहे ही जागा .….
म्हणून मी नेहमीच म्हणतो “घेतो तो श्वास खातो तो घास.. माझ्या बाबासाहेबांचाच”

हो , मी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र..

( माझया येणाऱ्या पुस्तकातील उतारा” प्रवास एका 8×10 च्या खोली पासून ते टाटा साम्राज्या पर्यंत)
राजा(राजेंद्र) गायकवाड
865515117
वसंत व्हॅली कल्याण2

Next Post

आंबेडकरी चळवळीतील दक्षणेतील सेनानी काशी कृष्णा यांचे विशाखापट्टनम येथे निधन.

रवि नोव्हेंबर 1 , 2020
विशेषतः सौदी अरेबियात व दक्षिण भारतात आंबेडकरी विचार कृतीतून पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले.आज सकाळी त्यांच्या कॅन्सर उपचारादरम्यान त्यांची जीवनयात्रा संपली.दुबईत कित्येक वर्षे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन चे ते कार्य करत होते व त्याच माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत […]

YOU MAY LIKE ..