१४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वच चळवळ क्रांतिकारी विचारावर आधारित होती.पण आजच्या सर्वच सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक आणि राजकीय चळवळीला वाळवी लागली.जो तो आपल्या परीने त्याची जाणीव पूर्वक वेगळी मांडणी करतो.ज्या प्रमाणे एक आंधळा हत्तीचे वर्णन करतो.जे हाती येते ते सांगतो.त्याचा प्रमाणे धम्मचक्र परिवर्तन दिन कि प्रवर्तन दिन असा शब्दाचा खेळ सुरु आहे.धम्मदीक्षाच्या दिवसाला ९० टक्के बौद्ध उपासक, उपासीका चुकीच्या अर्थाने एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देतात.14 ऑक्टोबर म्हणजे धर्मचक्र अनुवर्तन दिवस ( डॉ बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिलेली धम्मदिक्षा) दशहरा विजया दशमी म्हणजे धर्म नव्हे तर धम्मविजय दिवस (सम्राट अशोक द्वारा घेतलेेली धम्मदिक्षा ),आषाढ़ पूर्णिमा म्हणजे धर्मचक्र प्रवर्तन दिवस ( गौतम बुद्ध द्वारा ) परंतु बहुसंख्येने लोक धम्मचक्र परिवर्तन दिनच म्हणतातअसो पण शब्दाचा अर्थ समजत नसेल तर आचरण कसे करणार आहेच मोठा मुद्दा असायला पाहिजे म्हणूनच धम्म व धर्म यातील फरक समजून न घेता एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे चुकीचे आहे.
१४ ऑक्टोबर कि विजया दशमी हा ही एक खूप मोठा मुद्धा आहे.चळवळीतील धार्मिक आणि राजकीय लोकांच्या सोई नुसार उत्सवात साजरा केला जातो.अधिकृतरीत्या कोणीच सत्य मांडण्याचे लिहण्याचे धाडस करीत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास वाचला होता तो असा होता १४ ऑक्टोबर १९५६ पूर्वी जम्बुदिपात म्हणजे भारतीय बौद्धात विजयादशमी दिनाचे महत्व खूप होते. कारण विजयादशमी ही बौद्ध सम्राट अशोक यांच्या जीवनात घडलेली एक महत्वपूर्ण घटना आहे. त्यानी कलिंगराज्यावर विजय मिळविला तो दिवस सण म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली, किलिंगच्या विजयानंतर त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार करून विजयादशमी साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा इतिहास लक्षात घेवूनच विजयादशमीला धम्म दिक्षा सोहळा आयोजित केला तेव्हा १९५६ ला विजयादशमी १४ ऑक्टोबर रोजी होती. येवला येथे त्यांनी धर्मांतराची घोषणा १३ ऑक्टोबर १९३५ ला केली होती.त्या नंतर तब्बल २१ वर्षे अनेक धर्माचा अभ्यास करून बौध्द धम्माची निवड केली होती. प्रत्येक वर्षीच्या १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन साजरा करावा असे पहिल्या वर्धापन दिना पासून काही लोकांना वाटत होते. मात्र प्रत्येक वर्षी दसरा व विजयादशमी १४ तारखेला येत नाही, १४ ऑक्टोबर हि तारीख असून दसरा व विजयादशमी या तिथी आहेत, त्यामुळे दरवर्षी आपणास या तिथीच्या नुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करायला पाहिजे.आज ज्यांना तिथी व तारीख यातील घोळ माहित झाला.तसा डॉ बाबासाहेब आंबेडकर नांवाच्या ज्ञानसूर्या,महापुरुष,प्रकांड पंडित,कायदेपंडित यांना माहित नसावा असे काही लोकांना वाटते काय ?.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घडवून आपल्या ५ कोटी समाज बांधवाना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, “आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी तेव्हाच केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते. पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात नव्हे तर धम्मात येणे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धम्म पटला पाहिजे.तेहतीस कोटी देवाची पूजा अर्चा सुरू ठेऊन तुम्ही धम्मदिक्षा घेणार असाल तर ते चालणार नाही.तुम्हा बावीस प्रतिज्ञा घेऊनच धम्मदिक्षा घ्यावी लागेल.
मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी तेव्हाच केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते. पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात नव्हे तर धम्मात येणे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धम्म पटला पाहिजे.तेहतीस कोटी देवाची पूजा अर्चा सुरू ठेऊन तुम्ही धम्मदिक्षा घेणार असाल तर ते चालणार नाही.तुम्हा बावीस प्रतिज्ञा घेऊनच धम्मदिक्षा घ्यावी लागेल. -डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी धम्म दिक्षा दिली आणि धम्मचक्र गतिमान केले.मात्र ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे स्मरण म्हणून ह्या सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन हा १९५७ साली १४ अक्टोबर रोजी न घडविता ३ ऑक्टोबर १९५७ रोजी विजयादशमी दिवशी मोठ्या उत्सवात वर्धापन दिन पाळण्यात आला व नंतर बौद्ध समाजात १४ ऑक्टोबर १९५६ चे स्मरण सोडून तिथी नुसार येणारा अशोक विजया दशमी दिन सोहळा साजरा करण्याची प्रथा पाळण्यात आली. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा घोळ पहिल्या वर्षा पासून आज ६४ व्या वर्षी कायम आहे. याकरिता नेमके कोण दोषी आहे ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याची जबाबदारी आपल्या अनुयायातील राजकीय नेत्यावर न सोपवता ही सर्वस्व जबाबदारी त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक,धार्मिक कार्य करणाऱ्या आपल्या अनुयायांवर सोपवली होती.यात प्रामुख्याने वामनराव गोडबोले, मा.डो.पंचभाई, पं. रेवाराम कवाडे, तू. क. पाटील, भदंत आनंद कौसल्यायन यांचा समावेश होता.त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे होती आणि १४ ऑक्टोबर कि विजया दशमी हा वाद मिटविला पाहिजे होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या १४ ऑक्टोबरच्या बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्यात त्यांचे सर्व राजकीय अनुयायी सुद्धा उपस्थित असले तरी त्यांचा सर्व कल केवळ राजकारणाकडे होता. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिक्षा सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीच १५ ऑक्टोबर १९५६ रोजी शाम हॉटेल मध्ये आपल्या राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पर भाषणात म्हणतात, “एकंदर मला असे दिसते कि, तुम्हाला राजकारण जास्त प्यारे आहे, कोणत्याही गोष्टी पेक्ष्या राजकारणाची तुम्हाला जास्त आवड दिसते, माझे तसे नाही.मला धर्म जास्त प्यारा आहे, त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे.” (बौद्ध दीक्षा विशेषांक -प्रबुद्ध भारत – बी.सी.कांबळे ) आज ही हीच परिस्थिती आहे. धम्म कार्यापेक्षा राजकीय काम करण्याची प्रत्येक निष्टवंत शिष्य सैनिक आणि अनुयायी यांची इच्छा आहे.म्हणजे बहुजन हृदय सम्राट ही तेच,श्रेदय धम्म महाउपासक, राष्ट्रीय सल्लागार ही तेेच,राजकीय जाणकार वारसदार ही तेच वंचितांचे तारणहार ही तेच,कामगारांचे नेते ही तेच त्यामुळे धम्म चक्र गतिमान होण्या ऐवजी घर वापसी च्या मार्गाला लागले आहे. त्याची जागृत बौद्ध बांधवानी आणि अश्वगतीने धम्म प्रचार प्रसार करणाऱ्या मातृसंस्थानी योग्य दखल घेतली नाही. तर आपली लाखोंच्या संख्येने दरवर्षी एकत्र येणारा समाज म्हणजे एक ना धड भारा भर चिंड्या अशी झाली आहे.१४ ऑक्टोबर कि विजया दशमी हा व्यक्तीगत कार्यक्रम न होता त्याला ऐतिहासिक इतिहास आहे यांचे भान सर्वांनी ठेऊन एकच कार्यक्रम आयोजित केला पाहिजे.हीच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वा भारतीयां कडून अपेक्षा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व जागरूक वाचकांना ऍडव्हान्स हार्दिक मंगल कामना!.
सागर रामभाऊ तायडे- भांडूप मुंबई -९९२०४०३८५९.