बेड आणि वेळेत उपचार न मिळाल्याने कल्याण मध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू….

बेड आणि वेळेत उपचार न मिळाल्याने कल्याण मध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू….
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

कल्याण : केडीएमसी कोरोनाच्या विरोधात सज्ज असल्याचा दावा करीत असली तरी कल्याणमध्ये दोन जणांचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.एकाला उपचासाठी बेड मिळाला नाही तर दुसऱ्याला ऑक्सीजन व व्हेटिंलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारा जवळ पोहचली आहे. महापौर विनिता राणे, केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दावा केला होता की कोरोना विरोधातील लढ्यासाठी केडीएमसी सज्ज आहे,कुठेही कमतरता नाही.मात्र कल्याणमध्ये दोन जणांचा दुदैवी मृत्यूनंतर संपूर्ण शहरात भितीचे वातावरण आहे. या दोघांना वेळेवर उपचार मिळाला नाही.

एकाची प्रकृती चार दिवसापासून बिघडली होती.त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यांना गुरुवारी श्वास घेण्यास त्रस होऊ लागल्याने त्यांना कल्याणच्या कोविड होलीक्रास रुग्णालयात मध्ये घेऊन गेले. त्यांचा रिपोर्ट प्राप्त नसल्याने रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला नंतर त्यांना घेऊन रुक्मीणीबाई रुग्णालयात घेऊन आले.त्याठिकाणी ऑक्सीजनची व्यवस्था नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.दुसरी घटना कल्याण पूर्वेतील आहे. गुरुवारी एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांचे नातेवाईकांनी रुक्मीणीबाई रुग्णलयात आणले. त्याठिकाणी ऑक्सीजन सुविधा नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.या दोन्ही घटनेत मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बेडसाठी धावपळ केली होती मात्र केडीएमसी व खाजगी रुग्णालयात मदत मिळाली नाही.मुंबईजवळ असलेल्या कल्याण-डोंबिवलीत अश्या घटना घडत त्यामुळे राज्यसरकार लक्ष घालणार का हे पाहावे लागले.

सभार : सोशल मीडिया न्युज

Next Post

"कोरोनाने"सर्वांना स्व:ताची ओळख करून दिली

सोम जून 22 , 2020
कोरोनाने सर्वांना स्वताची ओळख करून दिली. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● सागर रा तायडे,भांडुप www.ambedkaree.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरले आहे.त्यावर काहींनी मात केली तर काही जीवघेणा संघर्ष करीत आहेत.कोरोना झालेल्या रुग्णाला रक्ताच्या नातलगानी शेवटच्या क्षणाला जवळ करण्यास किंवा अंतिमसंस्कार करण्यास नकार दिला. अशा […]

YOU MAY LIKE ..