एकसंघ आंबेडकरी चळवळ उभी राहायला पाहिजे.

दलित पँथर चा वर्धापनदिन:एकसंघ आंबेडकरी चळवळ उभी राहायला पाहिजे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
मिलिंद चिंचवळकर www.ambedkaree.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆


आंबेडकरी चळवळीत सोनेरी पान समजल्या जाणार्‍या दलित पँथरची निर्मिती, उदय अन्याय अत्याचार, त्यातच तथाकथित रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाचा संधीसाधूपणा, सामाजिक आर्थिक स्थिती, जाणिवा आणि सांस्कृतिक संघर्ष अशा अनेक प्रश्नी तरुण वर्गातील कमालीच्या चिड व नैराश्यातूनच झाली आहे. त्यामुळे संतप्त युवकांनी बंडखोरीची तुतारी फुंकली आणि दलित पँथरची पहिली बैठक, २९ मे १९७२ रोजी, सिद्धार्थ नगर, मुंबई येथे हजारो युवकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. १९७० च्या दशकापेक्षा आजही परिस्थिती काही वेगळी नाही. एखादी रोगाची साथ पसरावी तशा काही घटना सातत्याने घडत आहेत. त्याला रिपब्लिकन गटा तटाचे नेते पायबंध, निर्बंध घालण्यास, इतर मुलभूत प्रश्नी आणि राजकीय वाटचालीत सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे साहजीकच युवा वर्गासह समस्त आंबेडकरी समाज नाराज असून, एकूण परिस्थिती विषयी त्यांच्या मनी खदखद आहे. त्यांच्या भंगलेल्या समाज मनाचा उद्रेक केव्हाही होईल यात शंका नाही. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या चळवळीसाठी तो आग्रही आहे. एवढेच नाही तर तो सर्व पातळ्यांवर संघटीत होत असून, रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्नशील, कटिबद्ध आहे. म्हणून, त्यांच्या पाठिशी सर्व समाज घटकांने ठामपणे उभे राहणे आंबेडकरी चळवळीच्या यशस्वी, उज्ज्वल भवितव्यासाठी, दमदार वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

अन्याय अत्याचाराविरोधात आज अनेक पातळ्यांवर आपला संघर्ष चालू आहे. समाजातला तरुण वर्ग निराश, उदास असून, त्याच्या भावनांचा उद्रेक त्याच्या लिखाणातून जाणवतो. १९७२ साली शब्दांच्या सामर्थ्यांतून दलित पँथरची स्थापना झाली त्याच शब्दांच्या सामर्थ्यांतून पुन्हा एकसंघ आंबेडकरी चळवळ उभी राहायला पाहिजे. कारण, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना ‘पेन’ आणि ‘ब्रेन’ या शस्त्राच्या आधारे चळवळीला उभारी देण्याचा मंत्र दिला होता..

Next Post

आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली.

सोम जून 1 , 2020
आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली. ●●○●●●○●●●●●●●●●●●●●●●●● कवी : हर्षा बोले ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● तिने एकदा कविता लिहायला सांगितली तिच्या सुंदर डोळ्यांवर डोळ्यातल्या डबडबणा-या अश्रुवर अश्रु ओघळणा-या गालावर गालाखालील ओठांवर ओठातल्या शब्दांवर,शब्दांच्या भावनांवर तिच्या आखीवरेखीव नितंबावर स्तनावर, योनीवर,मासिक पाळीवर अन नवीन जन्म […]

YOU MAY LIKE ..