एकशे सस्ताविसाव्या जयंतीची कविता
————————————————
हे विश्वरत्ना
तुझ्या जयंतीचे हे एकशेपंचविसावे वर्ष जगभर साजरे होताना
मी गोळा करतोय
तुझ्या जिवनसंघर्षाचे पडसाद….
तूझ्या ऊंचीसमोर तुझे विरोधक खुजे ठरु लागलेत
तसं तर तुझ्या पश्चात त्यांनी तुला जातीत बंधिस्त करण्याचा खूप प्रयत्न केला
पण तु ऊधवस्त करत निघाला आहेस त्यांचे विकृत मनसुभे
जात,धर्म,पंथ,भाषा,प्रांत,राष्र्ट
अशा सर्वच विषमतेच्या भिंती
तुझ्या कर्तुत्वाची अफाट शक्ति
तुला मूक्त करत सुटली आहे विश्वभरात
आता तुझा विचार झेपावत सूटला आहे विश्वाच्या दिशेने
तुला दिसल्या बंधिस्त गूलामांच्या बेड्या
त्यांना दिसतो आहे तुझ्यात मुक्तिदाता
तुझ्यातुन प्रेरणा घेऊन ते बंड करुन ऊठलेत स्वातंत्र्याच्या दिशेने
तुला दिसल्या वंचितांच्या समस्या
तु बनवलीस संविधानाची गूरुकील्ली
तुला जाणवले शोषित पिडीतांचे दुःख
अन् तु घेऊन आलास जागतिक बुद्ध धम्माच्या वाटेवर
आज जगभरातील गुलाम,वंचित,शोषित,पिडीत
तुझ्या मानव मूक्तिच्या लढ्यात स्वतःला झोकुन
लढू लागलेत मानवतेच्या अधिकारांसाठी
जगातल्या कोणत्याही माणसाने आपापले राष्र्टीयत्व जोपासावे
असा संदेश देणारा तु राष्र्टप्रेमी
तुझ्या शत्रुंनीही तुझे कौतुक करावे
एवढा तु अजिंक्य
जगात जेवढ्या अपप्रवृत्ती ऊच्छाद मांडु लागल्याहेत
जेवढी यूध्दे हल्ले वंशभेद होऊ लागलेत
तिथल्या प्रत्येक माणसांमध्ये
तु जगण्याची आशा पल्लवीत करत आहेस वसंतासारखा
तु गायलेल्या मानवमूक्तीच्या स्वरात
जगाचे स्वर मिसळू लागले आहेत
तु तसा लढलासही अस्पृश्यांसाठी
पण तो तसा निव्वळ त्यांच्यासाठीचा लढा नव्हता
अस्पृश्य हे जगातील तमाम
वंचितांचे प्रतिनीधी
शोषितांचे प्रतिनीधी
पिडीतांचे प्रतिनीधी
गुलामांचे प्रतिनीधी
म्हणुन तु जगभरातल्या वंचित,शोषित,पिडीत,गूलाम
सर्वांचे प्रतिनीधीक म्हणुनही त्यांचा लढा लढलास
तु स्वातंत्र्याआधी धरलास समतेचा आग्रह
सर्वोच्च असते समतेचे स्वातंत्र्य
समतेशिवाय स्वातंत्र्य निरर्थक असते हे तुला कळले
तुझा लढा शेतकर्यांचा लढा
तुझा लढा शेतमजूरांचा लढा
सर्व विषमतांविरुध्दचा तुझा लढा
तुझे अभियान समतेचे
तुझे अभियान मानवतेचे
तूझे अभियान विश्वबंधूत्वाचे
तु ओळखलीस जगाची आर्थिक नाडी
तु मांडलेल्या आर्थिक सिध्दांताच्या पायावर
मानवि विकासाच्या गगनचुंबी ईमारती ऊभ्या होताहेत
तुला दिसली रक्तविरहीत लोकशाही
बाबा तझे सामाजिकत्व सर्वश्रेष्ठ
तुझा सामाजिक संघर्ष जगातल्या सर्व धर्मियांना प्रेरणा देतो
सामाजिक न्याय देताना तु पाहत नाहीस धर्म जात पंथ भाषा राष्र्ट
जगभरातील हवालदिल असहाय्य नैराश्य माणसे
आता झेपावु लागली आहेत तुझ्याकडे पंख फडफडुन
त्यांनी विद्रोह केलाय आता आत्याचारकांविरोधात
त्यांनी पुकारले आहे युध्द शोषकांविरोधात
त्यांनी यल्गार केला आहे मानवतेसाठी
तु निव्वळ दलितांचा कैवारी असणे शक्यच नाही
तु निव्वळ एकधर्मिय असनेही शक्यच नाही
तु फक्त आमचाच असनेही शक्य नाही
तर……
तु आहेस न्याय,समता,स्वातंत्र्य,बंधूत्व प्रस्थापित करणारा
तुच तर आहेस मानवीहक्कांचा रक्षणकर्ता
हे विश्वरत्ना तुझ्या जयंतीची वर्षामागुनवर्षे जसी सरत आहेत
तसतसी जगाला तुझ्या एक एक पैलुची ओळख होत आहे
बाबासाहेब आंबेडकर
तूझ्या ऐकशे सस्ताविसाव्या जयंतीवर्षी
हे जग तुला सॅल्युट करत आहे….
हे जग तुला सॅल्युट करत आहे…..
विद्रोही कवी: दादासाहेब यादव
संघर्ष निवास,कडधे,ता.मावळ,जि.पुणे
mob.7303366542