महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद,नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कायम / कंत्राटी कामगार यांना जाहीर आवाहन .
◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
“स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कायम / कंत्राटी कामगार यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे…
कोविड-१९ चा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना देखील तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम रितीने कामकाज करत आहात. सदर ठिकाणी काम करताना आपल्याला विविध अडचणी येत असतील परंतु संबंधित विभागाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याने आपल्या अडचणी सुटल्या जात नसतील. तसेच ह्या परिस्थितीत कामगार संघटनांचे पदाधिकारी आपल्या पर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने “स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” ह्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या अडचणी समजून घेण्यासाठी Google form तयार केलेला आहे. सदर फॉर्म वरती आवश्यक असलेली माहिती भरावी आमच्याकडे उपलब्ध झालेल्या माहितीवरून आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तुमचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येईल. तसेच ज्या कामगारांना Google form भरता येणार नाही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने किंवा आपल्या मुलांचे सहकार्य घेऊन Google form भरावा.
“विशेषत टीप” मुंबई महापालिकेच्या बाहेरील महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत ह्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी/कायम कामगारांकडे कर्मचारी संकेतांक नसल्यास त्यांनी आपल्या राहत्या ठिकाणचापिन कोड त्याठिकाणी नोंद करावा..
मुंबई महापालिकेच्या कामगारांना “कर्मचारी संकेतांक आवश्यक” आहे परंतु मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी (१ ते १०) हे अंक त्याठिकाणी नोंद करावेत...असे वरील
“स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे ह्याची माहिती अध्यक्ष मा गीतेश पवार यांनी www.ambedkaree.com शी बोलताना सांगितले.
सोबत गूगल ऑनलाईन फॉर्म ची लिंक देत आहे ती संबंधित कर्मचारी वर्गाने भरून पाठवावी असे ही ते म्हणाले.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeA9c0qhswAc48XuDFFcnz1Hv_mQkvpRerXVWekroZOAF9DRA/viewform