एकजुटीच्या दबावाच्या रेट्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याना अखेर नमावे लागले!

सर्वांची एकमुखी मागणी आणि आपल्या एकजुटीच्या दबावाच्या रेट्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याना अखेर नमावे लागले!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
प्रमोद रा जाधव www.ambedkaree.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीला क्रिमी लेअरची मर्यादा घालणारा ‘जीआर’ राज्य सरकारने काढला होता. मात्र त्याला एकसुरात कडाडून विरोध झाला.

अखेर तो वादग्रस्त जीआर स्थगित करणे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भाग पडले आहे. त्याआधी “राज्य सरकारने क्रिमिलेयरचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा…” अशी मागणी ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ ने केली होती. तर, जीआरचे समर्थन करणारी धनंजय मुंडे यांची भूमिका दैनिक ‘ जनतेचा महानायक’चे संपादक सुनील खोब्रागडे यांनी जोरकसपणे मुद्देसूद खोडून काढली होती. त्यांचा ‘मुंडे यांची अशी ही बनवाबनवी! हा लेख आणि जीआर रद्द करण्याच्या समाजाच्या मागणीला ambedkaree.com नेच जनमानसात सर्वदूर पोहोचवले होते. या लढ्यात अनुसूचित जाती, जमातींचा आवाज उठवलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

■ प्रमोद रा. जाधव
संचालक/संपादक
ambedkaree.com

https://ambedkaree.com/05/17/creamy-layer-cousefor-scstudentforinternationalscholarship/news/#.XsQSmWnhV6E

https://ambedkaree.com/05/18/sunilkhobragadeanddhanajaymundhe/news/#.XsGQ62nhV6E

Next Post

महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कायम / कंत्राटी कामगार यांना जाहीर आवाहन .

गुरू मे 21 , 2020
महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद,नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कायम / कंत्राटी कामगार यांना जाहीर आवाहन . ◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ “स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कायम / कंत्राटी कामगार यांना […]

YOU MAY LIKE ..