भगवान बुध्दाचे पंचशील हाच कोरोना वरील उपाय.

भगवान बुध्दाचे पंचशील हाच कोरोना वरील उपाय.
⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛
-मा.प्रभाकर जाधव www.ambedkaree.com

7 मे 2020. तथागत भगवान बुध्दाच्या जयंतीचा मंगल दिवस. भगवान’ बुध्दाचा धम्म विज्ञाननिष्ठ आहे म्हणून भगवान बुध्दाने प्रत्येक माणसाला स्वयंमप्रकाशित होण्याचा उपदेश केला. परप्रकाशित राहू नका असे सांगीतले. भगवान बुध्दाचा हाच दिव्य संदेश भारतवासियांना देवून आम्ही भगवान बुध्दाच्या जयंतीच्या शुभेच्छा देत आहोत.

‘ कोरोना ‘ रोगाचे सावट बुध्द जयंतीवर आहे तरीही भगवान बुध्दाच्या धम्माला मानणाऱ्या जगातील राष्ट्रांची मंगलप्रभात त्रिसरण व पंचशीलेने होईल. पंचशीलेतील पाच तत्वे मानवाला ” कोरोना ” विरूध्द लढायला सामर्थ्य देतात. भयंकर महामारीतून कसे जीवन जगावे याचे विज्ञाननिष्ठ, बुध्दीनिष्ट मार्ग दाखवता. ही तत्वे पाळणारे लोक ‘कोरोना ‘ विरूध्द लढणाऱ्या डाँक्टरांवर , परिचारिकांवर, कर्मचाऱ्यांवर आणि पोलिसांवर हल्ला करून “हिंसा” करणार नाहीत. डाँक्टरांची खोटी सर्टिफिकीटे दाखवून रस्त्यावर फिरणार नाहीत. “खोटे” बोलणार नाहीत. दुकाने फोडून “चोरी” करणार नाहीत. मद्यपान , दारू सेवन करून व्यभिचार करणार नाहीत.दारू पीऊन अब्रूचे धिडंवडे काढणार नाहीत तर घरात बसून सुरक्षित जीवन जगतील. आपल्या जीवाला जपतील तसे दुसऱ्याच्याही जीवाला जपतील. “मन” आणि “चित्त” ताब्यात ठेवतील. या मार्गाचा अवलंब प्रत्येक माणसाने केल्यास भारत “कोरोना” मुक्त होईल. भगवंताचे पंचशिल जगाला वाचवेल. म्हणून डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दाच्या धम्माचा स्वीकार केला.

प्रस्तुत लेखक ,राजकीय नेते,विचारवत असून ते रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (कांबळे) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत .माे.नं.9890818932

Next Post

कोरोना आणि आदरणीय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस!

रवि मे 10 , 2020
कोरोना आणि आदरणीय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस!प्रकाशामबेडकर ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ -मा.राजाराम पाटील कोरोना महामारीत साऱ्या सार्वजनिक उत्सव, जयंत्या आणि कार्यक्रमावर मृत्यूचे सावट आहे. परन्तु जेथे विचार आहे तेथे तेथे लिहिणे बोलणे आवश्यक आहे. या अर्थाने एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी बाळासाहेब आंबेडकर […]

YOU MAY LIKE ..