बाबासाहेबांची बदनामी
*****************
‘प्रिंट’च्या शेखर गुप्तांचे प्रा हरी नरकेंपुढे लोटांगण!
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
मुंबई,दि 20: भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मिळतेजुळते आहेत, असा दावा करणारे खोटारडे व्हिडीओ संघातर्फे भीम जयंतीला प्रसृत करण्यात आले आहेत। पण ‘द प्रिंट’ च्या वेबसाईटवर झलकवण्यात आलेल्या त्यातील एका व्हिडीओच्या खोटारडेपणाचा फुले-आंबेडकरी इतिहासाचे प्रख्यात संशोधक प्रा हरी नरके यांनी पोलखोल केले आहे।
त्यानंतर ‘प्रिंट’ चे संपादक शेखर गुप्ता यांनी ट्विटरवर त्या व्हिडिओतील खोटारडेपणा आणि आपली चूक कबूल करत प्रा नरके यांच्यापुढे अक्षरशः लोटांगण घातले आहे।
शेखर गुप्ता यांनी संघीय विचारांचे एक पत्रकार अरुण आनंद यांचा ” Ambedkar’s links with RSS & how their ideologies were similar”( डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संघाशी सख्य आणि त्यांच्या विचारांतील साम्य) हा व्हिडीओ प्रिंटवर झलकवला होता। त्यात बाबासाहेबांचे संघाशी निकटचे संबंध होते, असा अपप्रचार करताना पत्रकार अरुण आनंद यांनी तीन दावे केले होते।
■ दावा क्रमांक १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर एस.एस.चे कौतुक वाटत असे.
■ दावा क्रमांक २. १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात बाबासाहेबांनी [ आर.एस.एस. ] जनसंघाबरोबर युती केली होती.
■ दावा क्रमांक ३. आर.एस.एस.चे नेते आणि प्रमुख प्रचारक श्री दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांनी श्येड्य़ूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी नेमले होते.
अरुण आनंद यांचे वरील तिन्हीही दावे धादांत खोटे, सम्पुर्ण निराधार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणारे आहेत,असे ठासून सांगतानाच प्रा हरी नरके यांनी अरुण आनंद यांच्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ लिखित पुरावे सादर करा, असे आव्हानच शेखर गुप्ता यांना दिले होते।
अरुण आनंद यांचे तिन्ही दावे हे पूर्णतः निराधार, खोटारडे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे आहेत, असे नरके यांनी म्हटले होते। इतकेच नव्हे तर, प्रिंटच्या व्हिडिओत करणात आलेले दावे साफ झूट असल्याचे सिद्ध करणारे सज्जड पुरावेच त्यांनी उत्तरादाखल लिहिलेल्या लेखातून जाहीर केले होते।
**********************
हीच ती लिंक ज्या मध्ये अरुण आनंद यानी खोडसाळपणाचें दावे केले होते.
******************************
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बदनामीकारक व्हिडीओ तयार करणारे पत्रकार अरुण आनंद यांचे ‘ Know the RSS ( संघ जाणून घ्या) हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे। त्यांच्या व्हिडिओमुळे प्रिंटचे संपादक शेखर गुप्ता हे चांगलेच गोत्यात आले आहेत। त्यामुळे त्यांनी संघीय पत्रकार अरुण आनंद यांच्या खोटारडेपणाची आणि आपल्या चुकीची कबुली दिली आहे। इतकेच नव्हे तर, त्या व्हिडिओचे पोलखोल करणारा प्रा हरी नरके यांचा लेखही गुप्ता यांनी प्रिंटवर प्रकाशित केला आहे।
शेखर गुप्ता कोण आहेत ?
******************
शेखर गुप्ता हे पूर्वी ‘ इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाचे संपादक होते। आता ते ‘द प्रिंट’ या वेबसाईटचे संपादक आहेत। ते तिथे गेल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी स्वतःही दलित अल्पसंख्याकांबद्दल एक वादग्रस्त लेख लिहिला होता। लालूप्रसाद यादवांपासून ए राजा यांच्यासारख्या काही नेत्यांची उदाहरणे देत त्यांनी देशात दलित ओबीसी नेते सर्वाधिक भ्रष्ट असतात आणि तुरुंगातील गुन्हेगारांत मुसलमान अधिक असतात, असा दावा लेखात केला होता।( केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान हे चार दशके तर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले हे तीन दशके संसदीय राजकारणात आहेत। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप एकदा तरी झाला आहे काय?
पण मोठ मोठे घोटाळे करून देशातील बड्या सरकारी बँकांना खड्ड्यात घालणारे महाभाग कोण आहेत? शत्रूराष्ट्राला देशाची गुपिते पुरवण्यासाठी हेरगिरी करणाऱ्या माधुरी गुप्ता ( आय एफ एस) यांच्यासारख्या देशद्रोह्यांची जातकुळी शेखर गुप्ता हे तपासतील काय?
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆