“कोरोनाचा जनक चीन आणि बाबासाहेबांचे इशारे”
जगातील 210 देश कोरोनाच्या फेऱ्यात सापडले असून या महामारीने घेतलेल्या बळींची संख्या 1 लाखाच्यावर गेली आहे. महासत्तेच्या टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेसारख्या राष्ट्रांचीही अवस्था कोरोनाने केविलवाणी करून टाकली आहे. तिथे अन्य देशांची कथा ती काय! अर्थात, कोरोनाची महामारी ही चीनची दुष्ट करणी आहे. आपला शेजारी असलेल्या या देशाने पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसून भारतावर 1962 सालात आक्रमण केले होते। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाला मार्गदर्शन करतांना चीनकडून असलेल्या धोक्यांचा इशारा खूप आधी दिला होता.
काय सांगितले होते बाबासाहेबांनी?
प्रा हरी नरके यांनी भीम जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार
दिवाकर शेजवळ यांनी सुचवल्यानुसार खास ambedkaree.com साठी लिहिलेला विशेष लेख.येत्या मंगळवारी प्रसिद्ध होणार!