महात्मा फुले आणि भीम जयंती घरीच साजरी करण्याचे ऍड प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन….!

देशातील फुले, शाहू, आंबेडकरी समूहाला यंदाच्या म.फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवाहन !

आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करताय अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्याचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी. ह्या गरजू लोकांना अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्या.

यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनीही ती घरातून साजरी करावी यासाठी आवाहन करावे.

आपण सर्वजण या आवाहनाला साथ द्यायला ही अपेक्षा!

– प्रकाश आंबेडकर

#14April
#StayHomeStaySafe

Next Post

आंबेडकरी वास्तव कविता - कवी सुमित गुणवंत

शुक्र एप्रिल 10 , 2020

YOU MAY LIKE ..