“डॉ आंबेडकर जयंतीला”‘वाचन अभिवादन ‘करण्याचे आवाहन….!

“डॉ आंबेडकर जयंतीला”‘वाचन अभिवादन ‘करण्याचे आवाहन -‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’चा पुढाकार

पुणे:

कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंती दिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील ‘वाचन अभिवादन’ करून साजरी करावी,असे आवाहन ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ने केले आहे. ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या अध्यक्ष उत्कर्षा शेळके यांनी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

‘डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण घराबाहेर पडू शकत नाही,याबद्दल भावनिक होऊ नये. कुणीही घराबाहेर पडू नका,गर्दी करू नका.शासनाच्या आदेशाचे पालन करणे म्हणजेच संविधानाचा आदर राखणे होय. १४ एप्रिल या डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वलिखित,इतर लेखकांची त्यांचा जीवनकार्यावरील ग्रंथ आपण आपल्या घरीच थांबून अभ्यासावे,सोशल मीडियावरून या विचारांचा प्रसार करावा,सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर -मास्क,अन्नाचे चे गरजूना वाटप करावे,मुख्यमंत्री निधीला मदत करावी असे उत्कर्षा शेळके यांनी या पत्रकात म्हटले आहे.

मा.राजरत्न आंबेडकरानी सांगितल्या प्रमाणे,”मूकनायक ह्या वृकपत्राला १०० वर्षा पूर्ण झाली,आपण ह्या दिवशी(१४ एप्रिल २०२०) बाबासाहेब चॅनल करण्यासाठी आपल्या पगाराचा २०% भाग द्यावा.हीच बाबांना खरी आदरांजली ठरेल असे ही ते म्हणाले.
-उत्कर्षा शेळके.
(आंबेडकरी युवा अभ्यासक)

Next Post

महात्मा फुले आणि भीम जयंती घरीच साजरी करण्याचे ऍड प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन....!

सोम एप्रिल 6 , 2020
देशातील फुले, शाहू, आंबेडकरी समूहाला यंदाच्या म.फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवाहन ! आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करताय अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला […]

YOU MAY LIKE ..