तथागताची करुणा आणि सार्थ भीम जयंती याहून वेगळी काय असेल ?

तथागताची करुणा आणि सार्थ भीम जयंती याहून वेगळी काय असेल ?
***********************
ganarajyaadhishthan@gmail.com

आंतरराष्ट्रीय अरिष्ट ठरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरात साजऱ्या होणाऱ्या जयंती महोत्सवावर यंदा प्रथमच मर्यादा पडल्या आहेत. यावेळी भीम जयंती आपणा सर्वांना कौटुंबिक पातळीवरच साजरी करावी लागणार आहे.

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि त्याच्या फैलावला वाव मिळू न देण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सार्वजनिक स्वरूपात जयंती महोत्सव साजरा करण्याच्या आपल्या उत्साहाला मुरड घालणे यंदा भाग पडले आहे.

अशा परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावेळी कौटुंबिक पातळीवर साजरी करण्याची दक्षता घेऊन राज्य सरकारला सहकार्य करणेच पुरेसे नाही. त्याचबरोबर कोरोनाचा निःपात करण्यासाठी सरकारला पाठबळ म्हणून मुखमंत्री निधीत योगदान देण्याचे सामाजिक कर्तव्यही बजावायचे आहे. तथागत बुद्धाची करुणा मनात ओतप्रोत भरलेला बौद्ध समाज त्या कर्तव्यात अग्रभागी राहील, यात शंका नाहीच.

अवघ्या विश्वाचे आणि मानव जातीचे रक्षण करण्याच्या उदात्त कार्यातील आपल्या सक्रिय सहभागाहून तथागताची करूणा आणि बाबासाहेबांची सार्थ जयंती आणखी वेगळी काय असू शकेल ?

क्रांतीबा फुले (11 एप्रिल), डॉ बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल), तथागत बुद्ध ( 7 मे ) या तीनही जयंतीचा आनंदोत्सव आपण सारे देश करोना मुक्त झाल्यावर अफाट जल्लोषात साजरा करू या!
जयभीम. जय भारत.

■ प्रा डॉ जी के डोंगरगावकर
अध्यक्ष
9930958025

■ मनोज पैठणकर
उपाध्यक्ष
9423055777

■ दिवाकर शेजवळ
सरचिटणीस
9022609692

■ सतीश डोंगरे
कोषाध्यक्ष
9930328726

■ संजय जगताप ■ सीताराम लव्हांडे
■ रमेश मोकळं ■ हर्षल शाक्य
■ विक्रांत लव्हांडे ■ अनिल आहिरे
■ अरुण बनसोडे ■ पवनकुमार बोरुडे

●गणराज्य अधिष्ठान ●
GANARAJYA ADHISHTHAN

Next Post

"डॉ आंबेडकर जयंतीला"'वाचन अभिवादन 'करण्याचे आवाहन....!

सोम एप्रिल 6 , 2020
“डॉ आंबेडकर जयंतीला”‘वाचन अभिवादन ‘करण्याचे आवाहन -‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’चा पुढाकार पुणे: कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंती दिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील ‘वाचन अभिवादन’ करून साजरी करावी,असे आवाहन ‘महिला […]

YOU MAY LIKE ..