असॆ काय आहे “उतरंड”  ह्या आंबेडकरी चळवळीच्या बहूचर्चित चित्रपटा मध्ये ?

असॆ काय आहे
“उतरंड”  ह्या आंबेडकरी चळवळीच्या बहूचर्चित चित्रपटा मध्ये ?

का अनेक भीम सैनिक व त्यांची मित्र मंडळ आंबेडकर जयंती निम्मित्त सम्पूर्ण महाराष्ट्रभर या सिनेमाचे शो आयोजित करीत आहेत ?
1) कारण हा बाबासाहेबांच्या कार्याला वाहिलेला पहिला विद्रोही सिनेमा आहे
2) शिवाय जातीय अत्त्याचारात आजवर शहीद झालेल्या आपल्या तमाम निष्पाप बंधु भगिनींना हा काळजाचा थरकाप उडविणारा चित्रपट अर्पण केलेला आहे

हिंदू धर्माने आम्हांवर हजारो वर्षे लाद्लेल्या जातीच्या “उतरंडीने”
आमचा अतोनात महा भयंकर छळ केला आणि आज देखील करत आहे….
1 आमच्या लाखो निष्पाप बंधु भगिनिँच्या, आणि चिमुरड्या लेकराँच्या हत्त्या केल्या,
2 आम्हाला शिक्षणा पासून हजारो वर्षे वंचित ठेवले,
3 अन्न पाण्या वाचून तड्फडत ठेवले,
4 गावा पासून दूर ठेवले, वाळीत टाकले
5 हक्क मागितले तर आमचे हाथ छाटले
6 समता मागितली तर पाय तोडले
7 आमचे होते नव्हते ते सगळॆ लुटले
8 मंदिराकडे नुसते बघितले तर डोळे फोडले
9 कितीतरी स्त्रियांवर बलात्कार केले, त्यांचे अंग प्रत्यंग छाट्ले.
10 पुरुषांचे लिंग ठेचले, तर कधी कापले
11 कधी कधी तर आमच्या लोकांना जिवंतपणीच जाळले
12 बेच्छुट गोळीबार करुन आमचे हजारो गरीब निष्पाप लोक मारले!
13 कधी झाडाला लट्कवुन फाशी चढवले
14 तर कधी चाकू सुऱ्यांनी वार केले त्यांच्या जख्मेत मीठ कोम्बले
15 न्याय मागितला तर तेथेही हिंदुत्व आणले आणि हिंदू न्यायाधीशांनी अन्यायाने लाथाडले
इतके भयाण अत्त्याचार फक्त आम्हाला अतिशुद्र ठरवून केले
कुणी ?
तर हिंदू धर्माने
आजही आपल्या देशात दर 20 मिनिटाला एका दलित स्त्री वर बलात्कार होतो आणि प्रत्येक 50 मिनिटाला आपल्या एकाची हत्त्या
या सर्व अन्न्याय अत्त्याचाराँचा लेखा जोखा म्हणजे उतरंड!

खैरलान्जी ते खरडा, जव्खेडा, जज्झार ते कूम्हेल, शिर्डी ते बदायूं , घाटकोपर असॆ एकाहून एक महाभीषण जातीय हत्त्यासत्र म्हणजे आमचा ‘उतरंड’ हा सिनेमा!

आंबेडकरी चळवळीला आणि विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी* देशात समता आणि मानवता प्रस्थापित करण्यासाठी
लेखक दिग्दर्शक -सुदाम वाघमारे  आणि  निर्माते भूषणजी बोराडे  आणि त्यांची टीम गावोगावी फिरुन आपले संवििधान आपले अस्तित्व टिकविण्या साठी आपल्या बंधु भगिनींना चित्रपट दाखवून जागे करीत आहेत.
आणि हजारो बांधव तरुण तरूणी या अनोख्या आगळ्या वेगळ्या ऊपक्रमाने अक्षरशः भारावून एकत्र येऊन समता शांती मानवतेचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा करताहेत.

सुदाम वाघमारे नावाच्या या झपाटलेल्या दिग्दर्शकाने मुम्बई, नागपूर, वरूड, पुसला मोवाड, राहुरी, रहाता अहमदनगर, पुणे, जालना, नाशिक, औरंगाबाद, पालघर, अशा अनेक ठिकाणी या चित्रपटाचे चाचणी प्रयोग केले आणि थोडे थोडके नव्हे तर या माध्यमाद्वारे त्यांनी आजवर पाऊने दोन लाख लोक जोडले.
अशा या महत्वाकांक्षी उपक्रमाला आपल्या बौद्ध बंधु भगिनिँनी तन मन धनाने या चित्रपटाचा शो आयोजित करुन चळवळी ला मदत करावी ही विनंती 

सम्पर्क – सुदाम वाघमारे 98337772509 – 820208028 असे  कळविण्यात आले  आहे

Next Post

आपण बुद्धिस्ट का आहोत....?? —प्रश्न अस्वस्थ मानातला ..!

सोम एप्रिल 9 , 2018
  आपण बुद्धिस्ट का आहोत….?? —प्रश्न अस्वस्थ मानातला ..! प्रबुद्धजन हो…. मी एक सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे परंतु भारतीय नागरिक असतांना महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी आहे. मला अभिमान आहे, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य महार जात व आताच्या बौद्ध धम्मात […]

YOU MAY LIKE ..