वस्तीत माणसांच्या…..
गझल हा काव्यातील सर्वात कठीण आणि गंभीर प्रकार आहे .आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा ह्या विषयातहातखंडा होता …..गझल ही वृत्तात लिहिली जाते आणि ते ज्याला जमले तो मास्टर…..!
आंबेडकरी कवी वसंत वाघमारे यांनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आले …त्यांचीच गझल इथे देत आहोत.
वस्तीत माणसांच्या……!
(वृत्त – आनंदकंद), 24 मात्रा
(लग क्रम : नानार नारनाना नानार नारनाना)
वस्तीत माणसांच्या शोधून पाहिलो मी
जातीत वाटलेले जवळून पाहिलो मी
सारेच ओळखीचे होते इथे परंतू
न्यारेच डाव होते जागून पाहिलो मी
निर्माण शांतता ह्या विश्वात बुद्ध आहे
कित्येकदा तयांना सांगून पाहिलो मी
अंधार वेदनांनी आकाश व्यापलेही
बेभान वादळेही पेलून पाहिलो मी
वसंत वाघमारे
तेही खुजे निघाले…..
वृत्त – आनंदकंद, मात्रा 24
गागाल गालगागा गागाल गालगागा
उंचीस मोजणारे तेही खुजे निघाले
पंडीत म्हणविणारे तेही खुजे निघाले
थुंकीस झेलणारे येथेच थोर ठरले
भीमा परीस माझ्या तेही खुजे निघाले
सूर्यास झाकणारे अग्नीत ठार मेले
आकाश गमनकर्ते तेही खुजे निघाले
कोणी कुणास आता लेखू नयेच छोटा
मोठ्या दिलाचे बहुदा तेही खुजे निघाले
सोसून वेदनेचा पाठीवरी हिमालय
आई परीस जगती तेही खुजे निघाले.
-वसंत वाघमारे