महाराष्ट्र देशा जातीवादी देशा………!
अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात सैराट सारखी प्रकारे लोकांची मानसिकता दिसू लागली आहे .महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कमालीची जातिवादी मानसिकता दिसत आहे .अन यातुनच मग सैराट सारखी प्रकार घडू लागले आहेत गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यात बौद्ध समाजातील तरुणांची झालेली हत्या ह्या घडलेल्या प्रकाराने तर मन सुन्न होत आहेत पण यावर सरकारने काही पावले उचलायला हवी .
संबंधित माहिती खालील प्रामाणे
जातीयवादी गावगुंडानी केली बौद्ध युवकाची हत्या
-मिलिंद कांबळे चिंचवलकर
वैजापूर / प्रतिनिधी
शेजारच्या तरूणाने आपली मुलगी पळवून नेली या संशयावरून त्या तरूणाच्या घरावर हल्ला करून त्याच्या भावाचे मुंडके छाटल्याची खळबळजनक घटना वैजापूर जवळच्या खंडाळा या गावी शनिवारी मध्यरात्री घडली. या भयानक घटनेत मदतीला धावून आलेले त्याचे आई-वडीलही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपी दोघा भावांना अटक केली आहे.
संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणार्या या धक्कादायक घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्याती खंडाळा गावच्या शेतवस्तीवर बौद्ध कुटूंब गायकवाड आणि देवकर कुटुंब शेजारी शेजारी राहतात. बाळासाहेब गायकवाड कुटूंबातील मोठा मुलगा अमोल हा तीन दिवसापूर्वी कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घराकडे फिरकलेला नाही. विशेष म्हणजे शेजारी राहणार्या देवकर कुटूंबातील मुलगी नेमक्या याच सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. शेजारी राहणार्या अमोल गायकवाडनेच आपल्या मुलीला पळवून नेले या संशयावरून शनिवारी रात्री रोहिदास आणि देविदास हे दोघे देेवकर बंधू तलवार व कोयते घेऊन गायकवाड यांच्या घरावर चालून आले आणि त्यांनी झोपेत असलेल्या गायकवाड कुटूंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अमोलचे आई अलकाबाई गायकवाड (41) आणि वडील बाळासाहेब गायकवाड (47) गंभीर जखमी झाले. या अवस्थेतही त्यांनी भाऊ दादासाहेब गायकवाड यांचे घर गाठून हा प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी बाळासाहेब गायकवाड यांचा दुसरा मुलगा भीमराज (17) हा घरात झोपलेला होता. घराबाहेर काय चालले आहे हे समजण्यापूर्वीच देवकर बंधूनी तो झोपेत असतनांच तलवारीने वार करून त्याचे शीर धडा वेगळे केले आणि तेथून ते दोघेही पसार झाले. या अमानुष घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. अमोलच्या जखमी आई-वडीलांना वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीमराजचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.