शोध नव्या रत्नाचा……! एक भिंतचित्रकार आणि त्याची गोड गळ्याची “खुशी”……रत्न सापडलं….!
40 डिग्रीच्या उन्हात एक माणूस कल्याण मधील भिंतीवर पेंटिंग करत होता. गेल्या आठवड्यात मुंबई युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राच्या नवीन भिंतींवर तो चित्र आणि सोशल मेसेज लिहीत असलेला मी पाहत होतो. त्या रखरखत्या उन्हात त्याच्याबरोब एक लहान मुलगी नेहमी मला दिसत होती, ती त्याचीच मुलगी होती. पप्पाच्या हातात ब्रश दे , पुसायला फडका दे अशी कामे करत होती, माझं नवीन ऑफिस ह्याच इमारतीच्या बाजूला घेतलंय. अक्षर आणि चित्र एकदम सुंदर होत त्याच. मी त्याला विचारलं माझ्या ऑफिसचा साइन बोर्ड करायचा आणि रंग ही द्यायचा आहे. तो तयार झाला आणि मी सोपवलेलं काम उत्तम प्रकारे केलं, त्याच नाव सुरेश साठे. एकदम क्लास वन चा आर्टिस्ट,भिंतीवर हाताने जाहिराती लिहून आपलं घर संभाळणार हा कलाकार. तो राहतो कल्याण पासून 6 किमीवर . रोज मुलगी त्याच्याबरोबर येते , भिंतीवर पेंटिंग करून दोघे निघून जातात . त्याला मी विचारलं मुलीला का घेऊन येतात एव्हड्या लांब उन्हात? तर त्याने सांगितलं की तिला आवड आहे , म्हणून मागे लागून येते . आता शाळेला सुट्ट्याही आहेत. ती ही कलाकार आहे, गाणंही म्हणते , ती शास्त्रीय संगीत शिकते मीच शिकवतो, त्याने लगेच त्या गोंडस निरागस मुलीला म्हणजे खुशीला सांगितलं की साहेबाना गाणं म्हणून दाखव. खुशी तयार झाली ,
मा.गायकवाड सर आणि खुशी आपल्या वडिलांसोबत उजवीकडुन
माझ्या ऑफिस मध्ये गेस्ट असूनही मी तिच्या समाधानासाठी बोललो म्हण एखादं गाणं, तिने पवित्रा घेतला आणि पहिलच मराठी झकास आवडीचं गाण म्हंटल आणि मी आणि माझे गेस्ट आवक झालो, चांगली चार पाच गाणी ऐकूनही अजून आजून करत राहिलो. मला आज खरच एक रत्न मिळालं, सापडलं. आता खरी गरज आहे तिला मार्गदर्शन आणि पाठीवर हात ठेवण्याची, खुशीला आणि सुरेशला म्हणजे तिच्या वडिलांना मी आश्वासन दिलंय की खुशीच गाणं मी जगात पोहचवण्याचं काम करेन, तिला खरी गरज आहे आता एखाद्या संगीत तज्ञांची , तिला गरज आहे एखादा मोठं प्लॅटफॉर्म मिळवून द्यायची, मी प्रयत्न करणार, तुम्ही तीच गाणं एका आणि तुमच्या परीने तिला कशी मदत करता येईल ते ठरवा, तिला शाब्बासकी द्यायची आसेल तर खुशीच्या वडिलांचं फोन मी देत आहे. 9689523014,
शब्दांकन मा. राजेंद्र (राजा) गायकवाड
प्रस्तृृृत लेखक स्वता स्किल डेव्हल्पमेंट ट्रेनर असुन ते विविध व्यवसाय विषयक मार्गदर्शन करतात. www.ambedkaree.com चे आणि अस्मिता मल्टिपर्पज आॅर्गनाझेशन चे सल्लागार असुन आंबेडकरी चळवळीत सक्रिय असतात.)