“प्रभात पोस्ट”सन्मानित”मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020”
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या’मूकनायक’पाक्षिकाचा शताब्दी समारंभ शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि राजस्थानातील’प्रभातपोस्ट’तर्फे साजरा करण्यात आला.
हा मूकनायक राष्ट्रीय समान2020 जेष्ठ पत्रकार ,संपादक आणि www.ambedkaree.com
चे संपादकीय सल्लागार मा.दिवाकर शेजवळ यांना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड आणि माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकरसर यांच्या हस्ते देण्यात आला. सोबत पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,प्रभात पोस्टचे संपादक राजकुमार मल्होत्रा, माजी प्रधान आयकर महासंचालक के सी घुमरिया,ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील निवडक नामवंत साहित्यिक, विचारवन्त, कलावन्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला.