मुकनायकाचे कोडे….!-Riddles of Mukanayak

मूकनायकाचे कोडे-Riddles of MUKANAYAK
****************
◆ दिवाकर शेजवळ ◆
divakarshejwal1@ gmail.com

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत,अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘मूकनायक’ पाक्षिकाची शताब्दी आज देशभरात साजरी होत आहे। खप होणार नसेल आणि जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळणार नसेल तर वृत्तपत्र काढण्याचे धाडस कोणी कधी करेल काय? पण तसे धाडस बाबासाहेबांनी 100 वर्षांपूर्वी केले होते। अस्पृश्य समाजात साक्षरतेअभावी वाचकांचा दुष्काळ होता। गरिबीमुळे वृत्तपत्राचा खप होण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि बहिष्कृतांच्या वृत्तपत्राला जाहिराती, देणग्या मिळणेही दुरापास्त होते। अशा परिस्थितीतही बाबासाहेबांनी स्वतः आर्थिक झळ सोसत मुकनायकसारखी अनेक मराठी नियतकालिके चालवली। कारण वृत्तपत्र हाताशी नसलेल्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्ष्यासारखी असते, हे त्यांनी 100 वर्षांपूर्वीच ओळखले होते। त्यांची मुखपत्रे ही ध्येयवादी पत्रकारितेचा महामेरू होती।

मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी मराठी नियतकालिके चालवलेल्या बाबासाहेबांनी आपल्या ग्रँथाचे लेखन मात्र मराठीत केले नाही। तिथे त्यांनी इंग्रजी भाषेला पसंती दिली होती।

त्यांनी असे का केले? या कोड्याचे उत्तर काय आहे?

बाबासाहेबांनी लिहिलेल्या इंग्रजी ग्रँथांचा अनुवाद होऊन उशिराने का होईना, त्यांचे लिखाण सर्व भाषामध्ये प्रकाशित होऊन जगभरात पोहोचले आहे। पण त्यांनी ग्रँथाचे लेखन मराठीत केले असते तर त्याला मर्यादा पडल्या असत्या। त्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद होताना विपर्यास होण्याचाही धोका होताच। त्यांचे ग्रँथ मराठी नंतर इंग्रजीतून जगभरात पोहोचायला बराच काळ जावा लागला असता। हा धोका त्यांनी इंग्रजी भाषेला पसंती देऊन टाळला।

Next Post

मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020

शनी फेब्रुवारी 1 , 2020
“प्रभात पोस्ट”सन्मानित”मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या’मूकनायक’पाक्षिकाचा शताब्दी समारंभ शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि राजस्थानातील’प्रभातपोस्ट’तर्फे साजरा करण्यात आला. हा मूकनायक राष्ट्रीय समान2020 जेष्ठ पत्रकार ,संपादक आणि www.ambedkaree.com चे संपादकीय सल्लागार मा.दिवाकर शेजवळ यांना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा […]

YOU MAY LIKE ..