भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास सर्वच प्रतिगामी आणि पुरोगामी इतिहासकार याना आव्हान देणारा आणि त्या इतिहासकारांचे खरेपणा खुजा करणारा लढा…!
१९ व्या शतकातील दुसऱ्या शतकातील झालेल्या तिसऱ्या ब्रिटिश -मराठा युद्धा ने पुढच्या शतकातील दीडशे ते दोनशे वर्षा साठी भारताचा राजकीय व सामाजिक दिशाच बदलण्याचा पाया बनवला.
पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या किनाऱ्यावर कोरेगाव येथे सन १ जानेवारी १८१८ रोजी हे युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या छोट्या तुकडी आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मोठ्या सैन्यात लढले गेले .या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशवा याच्या सैन्याची जबरदस्त पराजय झाला.
जरी ही लढाई इतिहासात ब्रिटिश -मराठा साम्राज्य किंवा एंग्लो -मराठा असे शिकविण्यात येत असले तरी खरे तर ते मराठा राजांनी लढलेले नाहीय.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या दरबारातील ब्राह्मण मंत्री पेशव्यांनी सर्व राज्य कारभार आपल्या ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांच्या वारसांना राज्य कारभारातुन कित्येक वर्षांपासून बेदखल केले होते .
खरे तर ह्या युद्धाचे नाव ब्रिटीश आणि पेशवा किंवा एंग्लो -पेशवा असे असे म्हणायला हवे ते न म्हणता एंग्लो-मराठा असे म्हणतात हे भारतीय इतिहासाचे आजीब वास्तव आहे.
खरे तर भीमा कोरेगाव ची लढाई भारतीय इतिहास संशोधकांसाठी मोठे गूढ आहे या मागे असणारे सामाजिक सत्य की जे इतिहासात एक अनामिक आणि भारताचा इतिहास जातीपातीच्या विषमतेचे प्रतीक आहे त्या पासून दूर ठेवण्याचा प्रतिगामी आणि पुरोगामी इतिहासकार यात एकमताने सामील आहेत.
भीमा कोरेगावचा इतिहास ना हिंदूत्व राष्ट्रवादात जुळत आहे की ना वसाहत वादी अर्थात आधुनिक इतिहासात जुळत .या दोघांच्या ही विरोधात एक अस्वस्थ करणाऱ्या सत्यशोधक गोष्टींची दाखल घेत मुख्य विचारधारेच्या विरोधात बंड करीत तो दोनशे वर्ष जुन्या इतिहासाचे एक उपेक्षित सोनेरी पान आहे.
(वरील विषयाचा लेख द प्रिंट या प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झाला असून त्याचा वरील सैर अनुवाद )
-दिलीप मंडल
(प्रस्तुत लेखक हे भारतातील प्रमुख लेखकांपैकी आधुनिक आंबेडकरी विचाराचे प्रसिद्ध लेखक आहेत.)
मूळ लेख THE PRINT च्या हिंदी लेखाचे मराठी अनुवादक:प्रमोद रामचंद्र जाधव
सभार : द प्रिंट
(अनुवादित लेखात काही त्रुटी आढळून आल्यास क्षमस्व)