मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे आणि आद बाळासाहेब आंबेडकर यांची भेट.


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक .

26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी श्री. ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणा नुसार बांद्रा येथे त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
त्याची माहिती दस्तुरखुद्द आद बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल मीडिया वर दिलीय ती त्यांचाच शब्दात सविस्तर पणे …….!

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत भेट झाली. 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी श्री. ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली.

आंदोलन शांततेत पार पाडावे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे,हे स्पष्ट केले. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतय.

Next Post

काय आहे मनुस्मृति दहना मागील सत्य ..!

बुध डिसेंबर 25 , 2019
काय आहे मनुस्मृति दहना मागील सत्य ..! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड मुक्कामी ह्या विषमता वादी धर्मग्रंथाचे जाहीरपणे दहन केले. ज्या सामाजिक व्यवस्थेने हजारो वर्ष दीन दुबळ्या जनतेला जाचक अटी करून संपूर्ण समजतात विषमता निर्माण केली […]

YOU MAY LIKE ..