सफाई कामगारांच्या मुलाची गरूडझेप….! मुलगा बनला न्यायाधीश !
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली.
आपल्या
मागासलेल्या समाजात ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगती आणि ज्ञानाची जिद्द रुजवली महामानवांचा आदर्श घेत लाखो जन आपली प्रगती करत आहेत .जगातील एकमेव महापुरुष की ज्यांना समोर ठेऊन आपल्या जीवनातील प्रवास करून पुढे जात आहेत .
न्यायाधीश होण्याचे स्वप्न साकार झाले ?
लहानपणापासून आईवडील यांचे स्वप्न पुर्ण झाले .
प्रसार माध्यमांशी बोलताना ऍड कुणाल वाघमारे यांनीं सांगितले आपल्या यशाचे रहस्य.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिला जास्त वेळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून लहानपणापासून न्यायाधीश होण्याची मी स्वप्न पाहत होतो. रोज – तास अभ्यास घरीच करायचो. संघर्षाशिवाय यश कधीचि मिळत नसते. आज यशाचा दरवाजा उघडला. स्वप्न पाहण्यासाठी कमी वेळ आणि पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला. माझ्या यशात आई-वडील, बहिणी आणि पत्नीचे खूप मोठे योगदान आहे. योग्य तो न्यायदान करण्याचा प्रयत्न मी करीन. – ऍड. कुणाल वाघमारे, सोलापूर
महापालिका शाळेत प्राथमिक शिक्षण… आई व वडील महापालिकेत स्वच्छता कर्मचारी मात्र मुलाने न्यायाधीश व्हावे ही मनोमन ईच्छा. लहानपणापासूनच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्याचा ध्यास घेतलेल्या या युवकाचे नाव आहे कुणाल कुमार वाघमारे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला.
-संदर्भ आणि सभार : सकाळ वृत्त सेवा ,