कविता -मी प्रथमतः आणि अंतः भारतीय च प्रिये

एक कविता वास्तववादी……..
तू आणि मी

तू गोळवलकर तू सावरकर
मी आंबेडकर मी दाभोळकर

तू संघोट्याची औलाद प्रिये
मी राज्यघटनेचा श्वास प्रिये

तू गोडसेवादी अन हिंदुत्व
मी बंधुत्वतुल्यसम गांधीत्व

तू माफीनाम्याची आस प्रिये
मी भगतसिंगचा फास प्रिये

तू फितुर चाकरी ब्रिटिशांची
मी धगधग ज्वाला क्रांतीची

तू जखम हलाहल फाळणीची
मी रक्ताने लिहली घटना ग

तू बाजीरावची मस्तानी
मी ज्योतिरावची सावित्री प्रिये

तू बुधवार पेठचा गुलदस्ता
मी पंचशीलचा सच्चा रस्ता ग

तू साध्वी प्रज्ञाचा श्राप प्रिये
मी करकरेचे हौताम्य प्रिये

तू हिंसाचार अन दुराचार
मी सत्यनिष्ठा अन सदाचार

तू हिंदुस्थान अन मी भारतीय प्रिये

मी प्रथमतः आणि अंतः भारतीय च प्रिये

✍️पूर्णचंद्र रघुवंशी✍️

Next Post

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली.

सोम डिसेंबर 23 , 2019
सफाई कामगारांच्या मुलाची गरूडझेप….! मुलगा बनला न्यायाधीश  ! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली. आपल्या मागासलेल्या समाजात ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगती आणि ज्ञानाची जिद्द रुजवली महामानवांचा आदर्श घेत लाखो […]

YOU MAY LIKE ..