काल, २० डिसेंम्बर २०१९ रोजी आंबेडकर भवन दादर येथे एड.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली #NRC #CAA विरोधी आंदोलनाविषयीची मिटींग पार पडली. अतिशय शॉर्ट नोटीस मधे या मिटींगसाठी सामाजिक, राजकिय कार्यकर्ते, कलावंत, युवा कार्यकर्ते, मुस्लिम, शीख समाजातील कार्यकर्ते, ओबीसी, भटके विमुक्तांच्या संगठनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात हजर होते.
मीटिंग मध्ये वेगवेगळ्या समूहांच्या प्रतिनिधींनी #CAA #NRC ला विरोध करत आपले मत मांडले. या कायद्याचा फटका केवळ मुस्लिम समाजला बसणार आहे, बाकीच्यांना घाबरण्याचे काही कारण नाही हा भाजप आयटी सेलकडून केला जाणारा अपप्रचार हे सामाजिक कार्यकर्ते खोडुन काढत होते. या बिलाच्या आगीत मुस्लिम समाजासोबतच भटका विमुक्त समाज, गरीब निरक्षर जनता, ३० ते ४० वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले नागरिक आणि तृतीय पंथीय समाजाची सुद्धा होरपळ होणार आहे अशी भावना उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली.
सर्वात शेवटी उवस्थतीतांना मार्गदर्शन करताना एड.प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे, जाती,धर्माचे नसून सर्वांचे आहे आणि जे कोणी #CAA, #NRC विरोधी आंदोलन करत आहेत त्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांना साथ दिली पाहिजे अशी भूमिका मांडली. तसेच या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा प्रस्थापित नेत्यांकडून करू नका कारण ते विविध घोटाळ्यात अडकल्यामुळे सरकारशी पंगा घेण्याची हिंमत हरवून बसले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी केवळ आंदोलकांच्या भूमिकेत न राहता पुढे येऊन नेतृत्व हाती घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी संगठनांच्या प्रतिनिधींना केले.
या देशातला जो अलुतेदार-बलुतेदार वर्ग आहे ज्याच्यावर जागतिकीकरणामुळे परागंदा व्हायची वेळ आलेली आहे. त्या समाजला चेहरा नाही आणि नेतृत्व नाही त्या समाजाला #CAA, #NRCचा फटका बसणार आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. गडरिया सारख्या ज्या भटक्या जमाती पाकिस्तान आणि भारतातून वर्षानुवर्षे सीमा पार करून ये-जा करतात त्यांचे नागरिकत्व सरकार कशाच्या जोरावर करणार असा प्रश्न सुद्धा एड.प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती केला.
#CAA, #NRCच्या निमित्ताने देशात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करून त्या आड सरकारला सरकारी नवरत्न कंपन्या विकायच्या आहेत असा आरोप त्यांनी भाजल सरकारवर करून आपल्या पुढे हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होऊ न देणे आणि सरकारी कंपन्यांची विक्री करण्यापासून सरकारला रोखणे असे दुहेरी आव्हान असल्याचे त्यांनी उपस्थित लोकांना स्पष्ट केले.
आंदोलना विचारांची स्पष्टता असणे खूप गरजेचे आहे. ही लढाई भारत विरुद्ध आरएसएस अशी आहे. भारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व अशी ही लढाई आहे. भारतीय संविधानाने दिलेले नागरिकत्व नाकारून हे सरकार जनतेवर आरएसएस प्रणित नागरिकत्व लादत असून आपण सर्वांनी त्याचा एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे असे सांगत त्यानी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. येत्या २६ डिसेंम्बर रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जोरदार #CAA, #NRCविरोधात जोरदार आंदोलन करणार असून त्या संबंधी स्पष्ट भूमिका लवकरच प्रसिद्ध केली जाईल असे एड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.
या मिटिंगचे सूत्रसंचालन Siddharth Mokle यांनी केले तर Rajendra Patode यांनी उपस्थितीतांचे व मार्गदर्शकांचे आभार मानले.
या बैठकीत ज्या निवडक प्रतिनिधींनी भूमिका मंडळी त्यांची नावे खालील प्रमाणे.
1. अंबरसिंग चौहान (NTDNT)
2. भट्टाराम (TISS Student President)
3. दुर्गा गुडेल्लू (महाराष्ट्र वैदू विकास समिती)
4. फहाद अहमद (TISS)
5. मुमताज शेख (महिला मंडळ फेडरेशन)
6. शिवशंकर सिंह (उत्तरभारतीय ओबीसी)
7. टोना (North East – TISS)
8. तेजिंदर सिंग साहनी (शीख समुदाय)
9. नायाब अन्सारी (ऑल इंडिया उलेमा बोर्ड)
10. प्रवीण डाळिंबकर (अभिनेता)
मुंबईतील #CAA, #NRC विरोधी Resistance चा केंद्रबिंदू आंबेडकर भवन असेल अशी या मिटिंगमधून खात्री पटली. अजूनपर्यंत तरी आंबेडकर भवन मधे घुसून पोलिसांनी कोणावर कारवाई केल्याचे ऐकण्यात आलेले नाही. या ठिकाणी घुसणे आणि कोणाला अटक करणे याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याची पोलीस प्रशासनाला चांगली जाणीव आहे. आंबेडकर भवन हा मानवी हक्काच्या लढ्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. जो जो माणूस इथे येतो त्याच्या मनातील भीती दूर होते. तो इथून जाताना एक नवा आत्मविश्वास घेऊनच जातो याची काल पुरेपूर प्रचीती आली. #CAA, #NRC हा केवळ मुस्लिम विरोधी आहे हा गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. हा कायदा बहुसंख्य हिंदूंची सुद्धा छळवणूक करणारा आहे.
येत्या २६ तारखेला मुंबईत पुनश्च होणाऱ्या #CAA #NRC विरोधी आंदोलनाला आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या अघोरी कायद्याला विरोध करूया.