एनआरसी – कॅब या कायद्यासंबंधी आंदोलनांची पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक !
प्रिय सर्व संस्था, संघटना, विद्यार्थी, पक्ष, कार्यकर्ते आणि सर्व संबंधितांस…
आपणा सर्वाना माहित आहे की, एनआरसी (NRC) आणि कॅब (CAB) या दोन कायद्याविरोधात देशभरात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीचा सुरुवातीपासून विरोध आहे. वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मान. प्रकाश आंबेडकर यांनी या संबंधी भूमिका जाहीर केली असून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर पत्रकसुद्धा काढले होते.
हा कायदा फक्त मुस्लीम समूहांच्या विरोधात नाहीये तर इतर समूह देखील इथे लक्ष्य झाला आहे. हे दोन्ही कायदे देशाला मारक आहेत. असंविधानिक आहे. देश आज आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनेक उद्योग बंद झाले आहेत तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत.
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी या सारख्या मुलभूत समस्या आ वासून उभ्या असताना बीजेपी सरकारने या दोन कायद्याची मांडणी करून देशभर नागरिकांमध्ये ध्रुवीकरण तयार केले आहे.
हा त्यांचा राजकीय डाव असून संविधानांचा ते यासाठी उपयोग करू पाहत आहे. या संबंधी आंदोलनांची पुढील दिशा काय असावी? कशी असावी? यावर अधिक विचार विनिमय करण्यासाठी सर्व संविधानवादी, पुरोगामी संस्था, संघटना, विद्यार्थी, पक्ष कार्यकर्ते, साहित्यिक ई. ची बैठक वंचित बहुजन आघाडीचे अध्यम प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात येत आहे.
ही बैठक शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ.आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे करण्याचे ठरले आहे. तरी या बैठकीस आपण उपस्थित राहून पुढील रणनीती ठरविण्याच्या चर्चेत सहभागी व्हावे हि विनंती.
धन्यवाद !
– वंचित बहुजन आघाडी
संपर्क : रेखा ठाकूर
फोन नंबर – 9819584554