JNU Scientific Socialism चाप्रवास………

JNU Scientific Socialism चाप्रवास………!


JNU अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली मध्ये सध्या जे धगधगणार वातावरण सुरू आहे त्याबद्दल अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत,
कारणही अगदी तसच आहे 5860 रुपयांमध्ये ज्यांना वर्ष काढता येत होतं त्याना आता तब्बल 49,096 रुपये भरावे लागतील म्हणजेच हा खर्च 43,236 रुपयांनी वाढलाय, ही वाढ नक्की कोणत्या धर्तीवर आणि का केली ह्याच गणित चांगल्या चांगल्या लोकांच्या समजण्याच्या पलीकडे गेलंय.

असो यामुळे विदयार्थी चिडलेत, रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि नेहमी प्रमाणे पोलीस मुलं, मुली ह्यांना स्त्री पुरुष समतेच्या तत्वानुसार बेदम झोडत आहेत, हे इतक्यावरच थांबत नाही तर मुलींना कशाही प्रकारे मारणे, हाथ लावणे, अशी अनैतिक विटंबना ह्या दिल्लीत सध्या सुरू आहे.
परवा तर एका अंध विद्यार्थ्यांला तो मी अंध आहे असे सांगून सुद्धा तू अंध आहेस तर का आंदोलन करतोय म्हणत बेदम मारले. गेले तीन दिवसांपासून हा रक्तरंजित खेळ राजधानी दिल्लीत सुरू आहे.

विशेष म्हणजे, दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील देशाचा प्रधानमंत्री आणि दिल्लीचा मुख्यमंत्री यात अजूनही पडलेला नाहीये. हे सगळं कमी की काय तर या दोघांच्या व्यतिरिक्त दिल्लीत हजर असलेले लोकसभा आणि राज्यसभेच्या एकाही सदस्याने या विद्यार्थ्यांना भेट दिलेली ऐकिवात नाही ना कुठे बघायला भेटली(अपवाद असेल तर).


असो JNU ला आंदोलनाची पार्श्वभूमी नवीन नाहीये.
JNU च Student Politics जे Left to Central असलेल्या डाव्या संघटना, काही वर्षांपूर्वी दाखल झालेल्या ABVP सारख्या उजव्या संघटना तसेच NSUI, DSU, AISA, BAPSA त्या सगळ्यांच मिळून सुरू असलेल आणि कधीही न संपणार Student Debate.
पार सर्वोच्च न्यायालयाला ह्यांच्या निवडणुकीत पडावं लागत इतक्या ताकदीचे विद्यार्थी आहेत हे !!!

2000 सालचा Fehmita Riaz यांचा Indo Pak मुशायरा त्यात 2 आर्मी अधिकाऱ्यांनी केलेला हस्तक्षेप.

2010 चा “Operation Green” च्या विरोधात JNU Forum against War on People.

2015 ला दिल्ली उच्च न्यायालयाने 377 बद्दल दिलेला निवाडा आणि त्याबद्दल Right to Sexual Freedom and Identity बद्दलच Rainbow Walk.

ते 9 फेब्रुवारी 2016 ला कन्हैया कुमार आणि उमर खालिद वर लागलेला Sedition आणि त्याची Controversy हे सगळं सगळं काही JNU मध्येच होऊ शकत.

कारण काय तर हे काही साधं सुध कॉलेज, विद्यापीठ नाही तर हे विश्वविद्यालय आहे तुम्ही म्हणाल की विश्वविद्यालय म्हणजे काय तर,
JNU मध्ये काय काय आहे हे पाहुयात,
१. देशाच्या संरक्षणासंबंधी महत्वाच्या असलेल्या 6 इन्स्टिट्युशन JNU मध्ये आहेत त्यात आपली पुण्याची NDA (National Defence Academy) सुद्धा आहे.

२. अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचं मोठं Business स्कूल सुद्धा आहे.

३. IAS, MA in Public Management, कामगार,जीवशास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, जेनेटिक इंजिनिअरिंग, Astronomy, Health Science अश्या वेगवेगळ्या प्रकारचे देशातले 15 मोठमोठे इन्स्टिट्यूट हे JNU चा हिस्सा आहेत.
४. काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था सुद्धा JNU चा हिस्सा पूर्वी पासून आहेतच.

आता हे सगळं वाचून शिकलेल्या आणि पुरोगामी लोकांचे सुद्धा डोळे फिरले असतील ह्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रमाचा पसारा आणि आवाका बघून तिथे भक्तांची काय हालत झाली असेल याची कल्पना न केलेली बरी.

आता JNU च्या निर्मिती बद्दल थोडक्यात…..

अ). 1 सप्टेंबर 1965 ला शिक्षणमंत्री M. C. छागला यांनी राज्यसभेत JNU संदर्भात विधेयक सादर केलं तोपर्यंत याच नाव JNU नव्हतं.

ब). 16 नोव्हेंबर 1966 ला लोकसभेत विधेयक सर्वसंमतीने पारित झालं.

क). आणि बरोबर 22 एप्रिल 1969 ला ते आमलात आणलं गेलं.

आज जो गोंधळ करून आरोप होतोय की गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना मिळत असलेल्या कमी दरातील सुविधांना घेऊन त्याबद्दल राज्यसभेत त्यावेळी झालेल्या Debate मध्ये राज्यसभा सदस्य मा. भूषण गुप्ता यांनी उपस्थित केलेल्या चर्चेत शिक्षणमंत्री छागला यांनी पुढीलप्रमाणे जे काही म्हटलं आहे ते As it is लिहिलंय

ते म्हणतात की,

This should not be yet another University,
New facilities should be created, including “Scientific Socialism”
And one thing that, this university should ensure was to keep “Noble Ideas” in the mind and “Provide Accessibility to students from weaker sections of the Society”

मला वाटत विषमतावादी, ब्राह्मणवादी, मनुवादी आणि फॅसिस्ट भाडखाऊ लोकांची तोंड कायमची बंद करण्यासाठी हे वरील कोट परिपूर्णच आहे.

आता मूळ मुद्द्यावर येतो तो म्हणजे वार्षिक फी 5860 रुपयांवरून 49,096 रुपयांवर आणलेल्या अद्वितीय आणि अनाकलनीय फीवाढीच्या बद्दल चकार शब्द न काढलेल्या कुलपती अर्थात JNU चे Chancellor असलेल्या महान माणसाबद्दल बद्दल थोडंस…

नेमके कोण आहेत हे महाशय ???
तर हे महाशय हे कोणी साधी सुधी आसामी नाहीत तर हे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील सारस्वत ब्राह्मण असलेले माननीय “”विजय कुमार सारस्वत”” आहेत. ज्यांना आपण प्रेमाने V.K.Saraswat सुद्धा म्हणू शकतोच.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे ते खरंच माननीय आहेत कारण पृथ्वी मिसाईल बनवण्यात त्यांचं मोठं योगदान आहेच परंतु इतक्यावरच हे महाशय थांबत नाहीत तर ते “भारतीय वैझानिक अर्थात (Scientist)” सुद्धा आहेत.

इतकंच नाही तर त्यांनी DRDO अर्थात (Defence Research & Development Organisation) चे Director General म्हणून काम पाहिलंय.

त्यानंतर ते संरक्षण मंत्र्यांचे Advisor सुद्धा होते आणि 31 मे 2013 ला ते निवृत्त झालेत आणि मग JNU ला रुजू झालेत.

या सगळ्या प्रवासात आपण हे आजिबात विसरता कामा नये की आपल्या लाडक्या V. K. Saraswat यांना “पदमश्री” “पदमविभूषण” आणि या पुरस्काराच्या सुद्धा उंच असा जागतिक दर्जाचा “आर्यभट्ट पुरस्कार” सुद्धा मिळलेला आहे.

दरम्यानच्या काळात Defence मिनिस्ट्री मध्ये असताना
इतक्या मोठ्या उंचीच्या माणसाने काहीतरी चूक केल्याच्या कारणावरून CAG ने त्याना इंटर्नल ऑडिट मध्ये त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांच्यावर ताशेरे ओढले होते आणि त्यामुळेच त्यांच्या Financial Power कमी करण्यात आल्या होत्या आणि त्याना DRDO च्या प्रमुख पदासाठीच Extension थांबवलं नाही तर कायमच बंद केलं होतं.

आता येतो त्या व्यक्तिकडे जो JNU चा VC अर्थात कुलगुरू आहे, त्यांचं नाव आहे,
Prof. M. Jagadesh Kumar. दिल्ली IIT मध्ये प्राध्यापक असलेले आणि इलेक्टरीक इंजिनिअरिंग मध्ये निपुण घासून पुसून काम केलेले हे प्रोफेसर जगदेश असे व्यक्ती आहेत की ज्यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 4 वेगवेगळ्या लोकांमधून फायनल केलं ज्यामध्ये JNU चे V.S. Chauhan, RNK Bamezai, आणि Ramkrishna Ramaswamy हे होते.

सुधीर कुमार Sopory हे JNU चे मावळते VC ज्यांचा कार्यकाळ 27 जानेवारी 2016 ला संपला आणि प्रोफेसर जगदीश कुमार यांचा सुरू झाला.
सुरवातीच्या काळात त्यांनी Rss च्या एका कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि पत्रकारांनी विचारले असता त्यांनी तो माझा वयक्तिक प्रश्न आहे असे बोलून टाळले होते,
हे तेच आहेत ज्यांच्या काळात कन्हैया कुमार आणि उमर खालिद आणि JNU च्या विद्यार्थी सगळ्यात जास्त बदनाम झाले होते.

आता हेच VC आपल्या पध्द्तीने शहाणपणा करत विद्यार्थी आणि मीडियाला टोलवत आहेत.
हा तोच माणूस आहे जो पोलीस विध्यार्थ्यांना अमानुष मारहाण करीत असून देखील गप्प बसून आहे. विध्यार्थ्यांना भेट नाकारत आहे.

हे सगळं असूनही, दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू असूनही, देशाचा प्रधानमंत्री, राष्ट्रपती, दिल्लीचा मुख्यमंत्री, देशाचा HRD मंत्री, देशाचे प्रमुख विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते दिल्लीत अधिवेशन काळात तळ ठोकून असताना देखील हे आंदोलन चिघळत चाललंय काय म्हणावं यावर ????

यात Chancellor हे सगळं मुद्दामून करतोय की VC की VC ला आदेश देणारे वेगळे लोक आहेत ????

बर इतकं होऊन सुद्धा कोणी या सगळ्या विरुद्ध कोर्टात का जात नाहीत हे सुद्धा समजायला मार्ग नाहीये,

फी वाढ ही कोणत्या एका जात समूहाची झालेली नसून संबंध JNU मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची झालेली आहे ABVP च्या लोकांसकट मग अश्या परिस्थितीत आपण आपल्या विचारांना कोणत्या दिशेने निघायला हवं असे आदेश दिले पाहिजेत ???

देशाची Fascism कडे होत असलेली वाटचाल, बँकांची उघडझाप, चालू नफ्यात सुरू असलेल्या Air India आणि BPCL ची विक्री, BSNL, HAL आणि Ordinance Factory चा जाणीवपूर्वक संप, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, बाबरीचा निकाल सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक वार करून झाल्यावर आणि आता त्या पाठोपाठ JNU चा शैक्षणिक वार आपल्याला नेमका कोणत्या दिशेने घेऊन जात आहे ???

अश्याही परिस्थितीत जिवंत राहायचं की लढायच ???
की थोडं थांबून पुन्हा ताकदीने लढायच ???
हे Urgent की Important अश्या Priority वर येऊन ठेपलंय….

या सगळ्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक लढ्यातील एक एक व्यक्ती उद्याचा नायक आहे असे आम्ही समजतो आम्हाला आता JNU मध्ये “रोहित वेमुला” झालेला सहन होणार नाही.(रोहित वेमुला च्या केसमध्ये आजवर एकही अटक नाहीये) त्यामुळे तूर्तास या लढ्याला शक्य होईल तितकं कायद्याच्या चौकटीत आणावं अस मनापासून वाटत, कोर्टात आपल्याला आजवर न्याय मिळाला नाही हे माहीत असूनही कोर्टात गेल्यामुळे काही गोष्टी थोड्या स्थित सावर होतील अशी अपेक्षा आहे.

भाजपच्या विरोधात असलेल्या सगळ्याच विरोधी पक्षांनी घोर निराशा केलेली असतानाच,
पोलिसी दमनशाहीच्या दांड्याना निशस्त्रपणे केवळ जनावारांसारखा मार खाण्यात कोणताही शहाणपणा आणि शौर्य नाहीये अस मी समजतो त्यामुळे थोडं थांबा,

चित्ता सुद्धा मोठी झेप घेण्यासाठी विचारपूर्वक थोडं थांबतो, इकडे तिकडे बघतो, 4 पाऊलं मागे जातो आणि मगच उडी घेतो मला वाटतं मोठ्या लढाईसाठी काही छोट्या लढाया हरल्या किंवा तहात गेल्या तरी चालतील पण शेवटच्या लढाईसाठी काही गोष्टी वाचवाव्याच लागतील ती काळाची गरज आहे असं मी समजतो…

बाकी आपण सगळे सुज्ञ आहात.
पोस्ट अतिशय मोठी आहे आपण ती वाचली त्याबद्दल आपले आभार पोस्ट मध्ये चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्यासाठी नक्की कमेंट करावी ही अपेक्षा.

शेवटचं,
ही सगळीच राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कोंडी कशी फोडता येईल ???
कोण फोडू शकेल याचा Actionप्लॅन आणि कृती आराखडा अंमलबजावणी सहित तयार जो कोणी तयार ठेवेल त्यासाठी आणि त्याच्या सोबत शेवटपर्यंत काम करण्यासाठी कोणत्याही किंतु परंतु शिवाय कायम कटिबद्ध आहे कोणीही पुढाकार घ्यावा आपली काम करण्याची झोकून देऊन तयारी आहे.
तर चला आपण सगळे या कामाला लागूयात.
याच अपेक्षेसह इथेच थांबतो….

टीप : 614 Academic Staff असलेल्या JNU चे 200 कोटींच बजेट असलं तरी JNU मध्ये 8432 विद्यार्थी शिकत असून 8432 × 49096 = 413,977,472 म्हणजेच 41 कोटी, 39 लाख, 77 हजार 472 रुपयांची भर पडली तरी नेमकं काय हासील होणार हा प्रश्नच अनुत्तरित राहतो.

आपलाच,
महेंद्र अशोक पंडागळे
07678044677.

प्रस्तुत लेखक हे एम एस डब्लू असून सोशल सायन्स चे ते विध्यार्थी असून आंबेडकरी चळवळीतील एक तरुण सक्रिय कार्यकर्ते आहेत .

Next Post

भारताच्या भूमीत बुद्ध आणि बुद्धच दडला आहे .....हे सिद्ध करण्याची संधी बौद्धांनी गमावली.

गुरू नोव्हेंबर 21 , 2019
अतिशय दीर्घ लिहिलंय शांततेत वाचावं आणि योग्य ती प्रतिक्रिया द्यावीच ही विनंती. ___________ महेंद्र अशोक पंडागळे आजच्या अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या केसचा निकाल आलाय. #रामलल्ला_विराजमान #निर्मोही_आखाडा आणि #सुन्नी_वक्फबोर्ड या तीनही याचिकाकर्त्याना १/३ जागा जागा ३०/०९/२०१० ला #ईलाहाबाद_उच्चन्यायालयाने देऊ केली […]

YOU MAY LIKE ..