महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाची गरज ओळखून खेड्यातील समाज बांधवाना शहराकडे चला हा संदेश दिला .पुढे कोकणातील महार समाजातील लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आले मुंबईत आलेल्या या अकुशल कामगारांना कुठे कपड्यांच्या गिरणीत तर मुंबईतील महानगर पालिकेच्या विविध खात्यात खालच्या दर्जा च्या अर्थातच चतुर्थश्रेणी कामगार म्हणून पुढे काम मिळाले त्यांच्या पोट पाण्याचा प्रश्न सुटलाच पण पुढे महापालिका अनुकम्प कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ही रोजगार मिळला पुढे याच लोकांनी आंबेडकरी चळवळ आपल्या वस्त्या ,गावात जोमाने वाढवली त्यातील कामठीपुऱ्या येथिल सिध्दार्थ नगर सारख्या म्युनिसिपल कामगार वस्तीत दलित पँथर सारखा क्रांतिकारक चळवळीचा झंजावात निर्माण झाला .
हाडाचे कामगार नेते असणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई पालिकेच्या कामगारांसाठी आपल्या हक्काची द म्युनिसिपल कामगार संघ निर्माण करून पहिली मान्यताप्राप्त युनियन निर्माण केली .या युनियन चा महापालिकेवर मोठा दबाव होता पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर जशी आंबेडकरी चळवळीत दुफळी निर्माण झाली तशीच या ही कामगार युनियन मध्ये झाली त्यांनतर मात्र ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करत आहे .
मधल्या काळात बरेच बदल झाले हिंद मजदूर संघ प्रणित कामगार नेते शरद राव यांनीं म्युनिसिपल मजदूर युनियन ची जोरदार मुसंडी मारून आंबेडकरी बण्याच्या कामगार युनियन ला पांगळी केली.
मात्र इतिहासात कधीही काही ही स्थिर नसते तसेच सूत्र समान असतेच चळवळ नव्याने उभी राहते तसेच पुन्हा एकादा त्याच धर्तीवर एका नव्या स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन ची गेल्या वर्षी निर्मीती झाली . कामगार नेते निलेश नादवडेकर यांनी माहिती देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील कामगार चळवळ उभी करणार आहोत . अशी माहिती दिली.आता पाहूया की बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता ही संघटना करते का कारण सध्या विविध समस्यांना म्युनिसिपल कामगार सामोरे जात आहेत .त्यांच्या घराचा प्रश्न अधिकच बिकट होत आहे ,त्यांना इतर कामगार युनियन लुटत आहेत. ह्यातून बदल घडावा अशी आशा करता येईल. उद्या या संघटनेचा वर्धापन दिन आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत.
-प्रराजा