आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह.

आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह.

पर्वती मंदिर सत्याग्रह

अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रर्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. सवर्ण हिंदूनी सत्याग्रहींवर शिव्या व काठ्यांचा वर्षाव केला असला तरी सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी केलेला हा एक क्रांतिकारी प्रयत्न इतिहास विसरू शकणार नाही.

आंबेडकरी चळवळीचे आद्य सुधारक : शिवराम जानबा कांबळे यांचा विषयी थोडक्यात :

शिवराम जानबा कांबळे (इ.स. १८७५:पुणे, महाराष्ट्र – हे अस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते.शिवराम जानबा कांबळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्व काळातील पहिले पत्रकार, मुद्रक, प्रकाशन व संपादक म्हणून ओळखले जातात.

व्यक्तिगत जीवन परिचय :

शिवराम कांबळे यांचे वडील जानबा कांबळे पुण्यातील भांबुर्डे गावचे वतनदार महार होते. जानबा कांबळेंनी आपला गावकीचा व्यवसाय सोडून पुण्यात युरोपियन लोकांकडे नोकरी धरली. त्यांनी त्यांचा मुलगा शिवराम यास त्याच्या इच्छेप्रमाणे शिकू दिले. शिवराम यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले. त्यांचे राहते घर पुण्यातच्या लष्कर भागातल्या भीमपुरा 1373/6 येथे होते. तेथूनच ते दलितोद्धाराचे काम करीत.

शिवराम जानबा कांबळे हयांनी सन 1904 मध्ये ´श्री शंकर प्रसादिकीय सोमवंशी हित चिंतक मित्र समाज´नावे संस्था स्थापित केली आणि वाचनालय ही खोलली. ही भारतातली पहिली दलित समाज संघटित करणारी संस्था होय.

-संकलक : विनोद पवार ,कल्याण २२ प्रतिज्ञा अभियान

Next Post

स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन चा प्रथम वर्धापन दिन

शनी नोव्हेंबर 16 , 2019
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाची गरज ओळखून खेड्यातील समाज बांधवाना शहराकडे चला हा संदेश दिला .पुढे कोकणातील महार समाजातील लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आले मुंबईत आलेल्या या अकुशल कामगारांना कुठे कपड्यांच्या गिरणीत तर मुंबईतील महानगर पालिकेच्या विविध खात्यात खालच्या दर्जा […]

YOU MAY LIKE ..