राजकारण करून बेडूक उड्या मारत कोणत्याच पक्षाला अजून ही सत्ता स्थापन करण्याचे धाडस होत नाहीय .सेनेला ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळाले असे अजूनतरी रीतसर मानता येत नाहीय .
सत्ता स्थापनेसाठी व बहुमतातचा आकडा पार करण्याचा कालावधी खूप कमी आहे त्यात दोन्ही काँग्रेसने पुरेसा वेळ नसल्याने घोळ अधिक वाढला आहे .
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट यावी यासाठी केंद्राकडे अहवाल पाठवला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास मंजुरी दिली आहे .
राज्यपालांच्या निर्णयाला सेना कोर्टात जाणार आहे.मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरही सेनेकडे बहुमत सिद्ध करण्यास संधी मिळेल.
महाराष्ट्र राज्यातील जनतेला राजकीय नाटक गेल्या २० दिवसांपासून पहायला मिळत असून आता जनता याला कंटाळली आहे .
सध्या महाराष्ट्र राजकीय पेचात असून यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने राजकारण्यांचा माज उतरवला आहे. नवीन स्थापन झालेला वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाने बरेच डॅमेज करून पुरोगामी आणि प्रतिगामी लोकांची झीग उतरवली आहे .
तुर्तास …….बिगर भाजप सरकार अस्तित्वात येईल अशी दाट शक्यता आहे .