आठवणीतील साहित्यिक प्रा.अविनाश डोळस सर-महेश भारती

प्रा.अविनाश डोळस सर आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू पर्व . आंबेडकरी चळवळीत त्यांचे आदराचे स्थान गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांचा स्मृती जाग्या केल्या त्या सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे नेते महेश भारती यांनी.
प्रा अविनाश डोळस सरांचे साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि अविस्मरणीय आहे. मा.महेश भारती हे सम्यक विध्यार्थी आंदोलन चे नेते आणि भाष्य प्रकाशन चे सर्वेसर्वा आहेत.

प्रा. डाेळस सर कालकथित हाेऊन एक वर्ष हाेईल.बाबासाहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा मुंबईच्या मेट्रेा टाॅकीज जवळ आहे. त्या एलफिन्स्टन हायस्कूलला संशाेधक शिंदे, डाेळस सर आणि मी स्वत: भेट देऊन, त्याचे फाेटाे महाराषट्र शासन प्रकाशित आणि डाेळस सर संपादीत फाेटो बायाेग्राफी मध्ये टाकले आहेत.

जुनी मुंबई सरानी माझ्यासाेबत खूप पाहिली. ब्रिटीश कालीन बिल्डींग, त्याचे गाेथीक शैलीचे बांधकाम, मुंबईत पहिली रेल्वे प्रथम भायखला येथून सुरू झाली ती ठाण्यापर्यंत ते रेल्वेच वर्क्सशाॅप, आपेरा हाऊस, नेव्ही नगर, राणीची बाग त्या बागेतील काळा घाेडा,कुलाबा मच्छीमार नगर, आशियाटीक लायब्ररी, कलेक्टर ॲाफिस, लालबागच तमाशा थियटर,मांडवीत महात्मा फुले यांना महात्मा पदवी दिले ते ठिकाण, मुंबई गाेदी ,CST रेल्वे स्टेशनला बांधकामासाठी लागणारा दगड मालाडच्या खाडीतून कापून वापरला, राहिलेल्या दगडातून मुंबई पाेलिस कमिशनर बिल्डींग, महात्मा फुले मंडई बांधली. त्या त्या ठिकाणी प्रा. अविनाश डाेळस सरांचे पाय लागले.आज त्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या. नमन करताे,

प्रा. अविनाश डाेळस सर १,२, जून २०१८ राेजी गाेवा येथे सम्यक विद्यार्थी आंदाेलनाच्या शिबिराला ऊपस्थित हाेते. छान मार्गदर्शन केले. त्यांना सम्यक परिवाराकडून विन्म्र आदरांजली .

सदर माहिती सम्यक विध्यार्थी आंदोलन चे नेते मा महेश भारती यांच्या FB वॉल वरून सभार

Next Post

कृतीतून विधायक कामास सुरुवात ......!-

सोम नोव्हेंबर 11 , 2019
कृतीतून विधायक कामास सुरुवात ……! सामाजिक जाणिव काय असते त्यातून या विधायक काम कसे करता येऊ शकेल .केवळ कोरड्या चळवळी करून चालणार नसून त्याला कृतीची भर द्यावी लागेल .समाजातील अधिकाधिक वर्ग अजून ही मागास आहे त्यांचे मागासलेपण हे आर्थिक आहेच पण […]

YOU MAY LIKE ..