गेल्या २४ सप्टेंबर ला झलेल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक निकालाने महाराष्ट्र राज्यात मोठा पेच निर्माण केला आहे.
सत्ते साठी सेना-बीजेपी यांच्यात कलगी तुरा चालू आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते पडद्याआड मोठी समीकरण करत आहेत .त्यात महाराष्ट्रातील जनतेचे खुले हाल पाहायला मिळत आहेत.
योग्य वेळी सभागृह गठीत झाले नाही तर जनतेच्या प्रश्न व संविधानिक गोंधळ होऊ शकतो यावर गंभीरपणे विचार व्हावा . याच कारणाने वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज भवन येथे महामाहिम राज्यपाल यांची भेट घेतली .त्याचे सविस्तर माहिती त्यांनी आपल्या FB वर दिली असून ती त्यांच्याच शब्दात……!
भारतीय संविधानाच्या कलम 172 अनुसार सभागृहाचे सातत्य पुढे टिकून राहण्यासाठी आज सभागृहाच्या शेवटच्या दिवशी सभागृह गठीत करून नवीन आमदारांना शपथ देणे गरजेचे आहे.
असे न झाल्यास राज्यापुढे संवैधानिक पेच उभा राहील. या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतली.
#MaharashtraVidhansabha