चळवळीतून नाटक आणि नाटकातून चळवळ व त्यातून “स्टडी सेंटर ” उभे करण्याकरिता चळवळीतील अनोखा उपक्रम…..राबवत आहेत “भारतीय लोकसत्ताक संघटना अन लोक हितकरणी संस्था”
भारतीय लोकशाही.. या लोकशाहीला बळकट करणारे चार स्तंभ.पण या स्तंभांच्या मजबुतीचं काय? हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन “भारतीय लोकसत्ताक संघटना आणि लोक हितकारिणी संस्था” उभारतेय एक स्टडी सेंटर. या स्टडी सेंटरच्या उभारणीकरिता घेऊन आले आहेत एक अभिनव उपक्रम “चळवळीतून नाटक, नाटकातून चळवळ” याचाच पहिला भाग म्हणून दि.१० नोव्हेंबर सायंकाळी ७.३०वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे आयोजित करण्यात आला आहे. “सिद्ध “आर्ट निर्मित,” “अद्वैत” प्रकाशित मानवी हक्कांच्या संघर्षाची मांडणी करणारं सुभाष नारायण लिखित ,दिग्दर्शित दोन अंकी नाटक -“प्रेषित द प्रोफेट”.
“प्रेषित द प्रोफेट”.या नाटकाच्या तिकिटविक्रीतून जो निधी उभा राहणार आहे,त्यातून उभ राहणार आहे भारतीय लोकशाहीचे चार स्तंभ बळकट करणारे स्टडी सेंटर.
तेव्हा या.. हे नाटक पाहा..आणि भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या या प्रक्रियेत एक जागरूक भारतीय नागरिक म्हणून सहभागी व्हा. असे आव्हान करण्यात आले आहे.
-मनीष जाधव ,सायन ,मुंबई